SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तो मूर्खपणा करत आहे...' सँडपेपर प्रकरणात पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजाला म्हटले खोटारडा

उस्मान ख्वाजाने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात अनेक मोठे खुलासे केले आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात उस्मान ख्वाजाने केलेले खुलासे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 13, 2026, 02:42 PM IST | Updated: Nov 13, 2026, 02:58 PM IST
Join

मागील काही दिवसांपासून उस्मान ख्वाजाने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात अनेक मोठे खुलासे केले आहेत. यावर ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी या धक्कादायक प्रकरणासंदर्भात उस्मान ख्वाजाने केलेल्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. त्यानंतर आता मागील काही काळापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा आताचा कर्णधार पॅट कमिन्सने यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्याने मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात उस्मान ख्वाजाने केलेले खुलासे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी पॅट कमिन्स म्हणाला, "जेव्हा उस्मान म्हणतो की आम्हा सर्वांना माहीत होतं... जर त्याचा अर्थ असा असेल की मैदानावर सँडपेपर वापरला जाणार आहे हे आम्हाला माहीत होतं, तर तो शंभर टक्के चुकत आहे. मी गेल्या आठ वर्षांपासून हेच ​​सांगत आहे. मला याची काहीच कल्पना नव्हती, पण मला वाटतं की उस्मान खरंतर त्यापेक्षाही अधिक गंभीर गोष्टी बोलत आहे. तो म्हणतो की मी आणि इतर जण सँडपेपरमध्ये फेरफार करण्याच्या योजनेचे सूत्रधार होतो. ही निव्वळ बकवास आहे."

हे ही वाचा

IND vs PAK आशिया कपसाठी होणार महामुकाबला! टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज...

कमिन्सने पुढे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की, ख्वाजा यांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु असे आरोप करण्याची जबाबदारीही असते. अशा आरोपांचा इतरांच्या जीवनावर परिणाम होतो. ते म्हणाले, "त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. त्यांना असे करण्याची मुभा आहे याचा मला आनंद आहे. मात्र, आपण जे बोलतो आणि करतो त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदार असले पाहिजे."

जेव्हा एका पत्रकाराने कमिन्सला विचारले की कोणाची बाजू खरी आहे, तेव्हा तो म्हणाला: "ही माझी कहाणी आहे. त्यामुळे मला वाटतं की तो चुकत आहे... मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट खूप आवडतं. त्याने मला खूप काही दिलं आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर खूप मोठा परिणाम होतो, आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने त्याने त्याची कहाणी सांगितली आहे, ती त्याने खूप सहजपणे सांगितली आहे. त्याचा अनेक लोकांवर परिणाम होतो, आणि सध्या मी याच गोष्टीशी झगडत आहे, कारण मला वाटत नाही की हे योग्य आहे."
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES