दारूशिवाय नशा होणं शक्य आहे? जाणून घ्या ऑटो-ब्रूअरी सिंड्रोमचं रहस्य
तुम्ही अल्कोहोल न पिता तुमच्या शरीरामध्ये अल्कोहोल तयार होऊ लागला तर? तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, या विज्ञानाच्या जगात यामागचं कारण आणि परिणाम जाणून घ्या.
दारु पिणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे हे सर्वानाच ठाऊक आहे, दारु पिल्यानंतर फक्त नशाच येत नाही तर गंभीर आजार होतात असे काही आजार आहेत ज्यामुळे जीव देखील गमवावा लागू शकतो. पण तुम्ही अल्कोहोल न पिता तुमच्या शरीरामध्ये अल्कोहोल तयार होऊ लागला तर? तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. विज्ञानाच्या जगात ही स्थिती शक्य आहे, सांगायचे झाले तर शरीरामध्ये अल्कोहोल तयार होते आणि व्यक्तीने दारु न पिताही नशेमध्ये राहते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम' असे म्हणतात. 'ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम' म्हणजेच काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम (ABS) म्हणजे काय?
एशियन जर्नल रिसर्चनुसार , ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम ही एक दुर्मिळ आणि कमी नोंदवली जाणारी वैद्यकीय स्थिती आहे, जिला आतड्यांतील किण्वन सिंड्रोम किंवा अंतर्जात इथेनॉल किण्वन असेही म्हणतात. या स्थितीत, आतड्यातील बुरशी किंवा यीस्टसारखे सूक्ष्मजीव कर्बोदकांचे किण्वन करून शरीरात अल्कोहोल (इथेनॉल) तयार करतात. यामुळे अल्कोहोलचे सेवन न करताही व्यक्तीला नशा चढल्यासारखे वाटू शकते. या स्थितीत, व्यक्तीमध्ये अल्कोहोल सेवन केल्यानंतर दिसणारी लक्षणे दिसतात, ज्यात चक्कर येणे, तोल जाणे आणि वर्तणुकीतील बदल यांचा समावेश असतो. जर एखादी व्यक्ती अल्कोहोलचे सेवन करत नसतानाही तिला नशा चढल्यासारखे वाटत असेल, तर ही रक्तदाबाची समस्या आहे असे गृहीत धरण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमचा शरीरावर होणारा परिणाम
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमचा परिणाम आतड्यावर होतो, आतड्यांतील सूक्ष्मजीवसमूह (गट फ्लोरा) हा आपल्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या सूक्ष्मजीव, जीवाणू आणि बुरशी यांचा एक गट आहे, जो पचन आणि एकूण आरोग्यासाठी मदत करतो. याला आतड्यांतील सूक्ष्मजीवसमूह (गट मायक्रोबायोटा) किंवा आतड्यांतील सूक्ष्मजंतूस (इंटेस्टाइनल मायक्रोफ्लोरा) असेही म्हणतात. ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमचा यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. एशियन जर्नल रिसर्चनुसार , ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमचे परिणाम केवळ नशेपुरते मर्यादित नाहीत, तर त्याचे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात.
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोममुळे यकृतावर देखील परिणाम होऊ शकतो, ऑटो-ब्रुअरी सिंड्रोममुळे यकृतावर ताण वाढतो आणि यकृत हे इथेनॅालते चयापचय करते आणि ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये यकृताला इथेनॉलच्या अतिरिक्त प्रमाणाचा सामना करावा लागू शकतो. रक्तातील अल्कोहोलची पातळी वाढल्याने चक्कर येणे, गोंधळ आणि विचार करण्याच्या क्षमतेत अडथळा येणे यांसारखी मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे देखील उद्भवू शकतात.