रणजी ट्रॅाफी नवा हंगाम सुरु झाला आहे, मागील दोन दिवसांमध्ये टीम इंडियाच्या अनेक स्टार खेळाडूंची कामगिरी चर्चेत पाहायला मिळाली आहे. तुषार देशपांडे, उमेश यादव, रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. आता रणजी ट्रॅाफीच्या नव्या सिझनमध्ये अनेक नव्या खेळाडू देखील चर्चेत पाहायला मिळत आहेत. अंडर 19 विश्वचषकातील भारतीय संघाचा उपकर्णधार विहान मल्होत्रा त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. 19 वर्षीय युवा फलंदाज विहान मल्होत्राने शानदार शतक झळकावले आहे. पंजाबकडून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या विहानने आसामविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
एवढेच नाही, तर हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला प्रथम-श्रेणी सामना आहे, ज्यात त्याने पहिल्याच डावात शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी, त्याने 2026 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली होती. विहान आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा एक भाग आहे. आसामच्या 373 धावांच्या भक्कम धावसंख्येचा सामना करण्यासाठी पंजाबला एका मजबूत सुरुवातीची गरज होती. डावाची सुरुवात करताना, विहानने सहकारी सलामीवीर हरनूर सिंगसोबत पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भक्कम सलामीची भागीदारी करून विरोधी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले.
हे ही वाचा
लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विहानने एका अनुभवी फलंदाजाप्रमाणे डावाला पुढे नेले. पंजाब आणि आसाम यांच्यात न्यू चंदीगड येथे रणजी ट्रॉफी 2026-27 एलिट गट 'ब' चा सामना खेळला जात आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या आसामने आपल्या पहिल्या डावात 373 धावा केल्या. प्रत्युत्तरात, विहान मल्होत्रा आणि हरनूर सिंग यांनी 137 धावांची सलामीची भागीदारी करून पंजाबला चांगली सुरुवात करून दिली.
KEEP AN EYES ON THIS GUY, VIHAAN MALHOTRA. A REFLECTION OF VIRAT KOHLI & SHUBMAN GILL IN HIM. - Playing his first ever First Class Match in Ranji Trophy and scored a calm, composed & risk free Hundred. https://t.co/kkdF41jV3V
— Tanuj (@ImTanujSingh) October 13, 2026
विहान मल्होत्रा कोण आहे?
विहान मल्होत्राचा जन्म 1 जानेवारी 2007 रोजी पतियाळा येथे झाला. तो एक फलंदाजी अष्टपैलू खेळाडू असून डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे. विहानने भारतीय 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि 2026 चा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता. त्याने ज्युनियर संघासोबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही केला आहे. त्याने 2025 च्या 19 वर्षांखालील आशिया कप आणि त्रिकोणीय मालिकेतही सहभाग घेतला होता.