हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?
आयपीएल 2027 आधी अनेक फ्रन्चायझींनी त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. आता मागील काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जच्या संघ ट्रेड करणार याबद्दल चर्चा सुरु आहे, यावर आता सीएसकेच्या माजी खेळाडूने मोठा दावा केला आहे.
मागील काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत, काही मोठे ट्रेड देखील आयपीएल 2027 आधी झाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये रिषभ पंतने त्याचा संघ सोडला आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. तर कुलदीप यादव आता लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाकडून आगामी सिझनमध्ये खेळताना दिसणार आहे. काही दिवसांमध्ये आयपीएल 2027 चा मिनी लिलाव होणार आहे, याआधी अनेक फ्रन्चायझींनी त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. आता मागील काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जच्या संघ ट्रेड करणार याबद्दल चर्चा सुरु आहे, यावर आता सीएसकेच्या माजी खेळाडूने मोठा दावा केला आहे.
मागील सिझनमध्ये हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सर्व काही ठिक नाही अशा चर्चा पाहायला मिळत होत्या. हार्दिक पांड्या आयपीएल 2027 मध्ये कोणत्या संघाकडून खेळणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते. अनेक वृतांनी दिलेल्या माहितीनुसार असा दावा केला जात आहे की चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या तीन फ्रँचायझींचे चाहते या विषयावर सक्रियपणे चर्चा करत आहेत. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने पांड्याच्या ट्रेडबाबत एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. चेन्नई सुपर किंग्स तीन प्रमुख खेळाडू देऊ शकते असे वक्तव्य केले आहे.
हे ही वाचा
स्मृती आणि हरमनप्रीतमध्ये बिनसलं? हॅन्डशेक प्रसंगानंतर सोशल मीडियावर चर्चा, VIDEO
भारताचा स्टार माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर अनेकदा त्यांची भारतीय क्रिकेटसंदर्भात मत मांडत असतो. आता त्याने आयपीएल 2027 च्या आगामी सिझनआधी चेन्नई सुपर किंग्जचा संघ हार्दिक पांड्याला घेण्यासाठी उत्सुक आहे असा दावा त्याने केला आहे. पुढे आर अश्विन म्हणाला की, "मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात केवळ शिवम दुबेला घेणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यांना दुबेसोबत म्हात्रेलाही हवे असेल. मला वाटत नाही की मुंबई म्हात्रेशिवाय पुढे जाईल. चेन्नई सुपर किंग्स हार्दिकसाठी दुबे आणि एलिसला ट्रेड करण्यासारख्या इतर पर्यायांचाही विचार करू शकते."
मागील काही दिवसांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दक्षिण आफ्रिकेच्या अल्बी मॉर्केलची झहीर खानचा उपप्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तो सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहील. भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्माची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडच्या गॅरेथ बॅटीचीही सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.