रणजी ट्रॅाफी 2026-27 ला सुरुवात 11 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे, त्याआधी आता अनेक संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक भारतीय संघामध्ये दमदार कामगिरी करणारे संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. रणजी करंडक स्पर्धा 2026-27 ची सुरुवात काही दिवसांमध्ये होणार आहे, या स्पर्धेसाठी राजस्थान आणि दिल्ली या संघाची घोषणा करण्यात आले आहे. बरोडा विरुद्ध गोवा आणि दिल्ली विरुद्ध बंगाल यांच्यामध्ये सामना होणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) आगामी हंगामासाठी आपले संघ जाहीर केले आहेत, यामध्ये कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले यासंदर्भात सविस्तर वाचा.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करणारा अष्टपैलू मानव सुथारला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मानव सुथार आता पहिल्या दोन सामन्यांमध्ये राजस्थान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, त्यामुळे . दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने लक्ष वेधून घेतलेल्या आयुष बडोनीकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व असेल. राजस्थानने पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आता त्याला राजस्थानचे कर्णधारपद भूषवण्याची संधी देण्यात आली आहे. महिपाल लोमरोर यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2026-27 रणजी ट्रॉफीमधील राजस्थानचा पहिला सामना तामिळनाडूविरुद्ध जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. दुसरीकडे, दिल्लीचा सलामीचा सामना बंगालशी होईल. हा सामनाही 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. सामन्यांची वेळ सारखीच असेल, परंतु दोन्ही संघ बंगाल क्रिकेट अकादमीच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळतील.
मानव सुथार (कर्णधार), महिपाल लोमरोर (उपकर्णधार), रोहन राजबर, सचिन यादव, सुमित गोदारा, कार्तिक शर्मा, करण लांबा, अंशुल गढवाल, मुकुल चौधरी (विकेटकीपर), दर्शन जैन (विकेटकिपर) अजय कुकना, आकाश शर्मा, दानश शर्मा, दानश शर्मा, दानशू सिंह.
आयुष बडोनी (कर्णधार), यश धुल (उपकर्णधार), अनुज रावत (विकेटकीपर), प्रणव राजवंशी (विकेटकीपर), सनत संगवान, आयुष डोसेजा, देव लाक्रा, हृतिक शोकीन, दिविज मेहरा, मणि ग्रेवाल, सिमरजीत सिंग, नवदीप सैनी, सरुष रणवीर, ऋषिक रणवीर, ऋतिक शोकीन. माथूर.