भारताच्या संघाची भारतामध्ये सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु होती, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने एकतर्फी मालिका नावावर केली. दुसऱ्या सामन्यामध्ये विशेषत: वेस्ट इंडिजच्या संघाने या सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत असताना 400 धावांचा आकडा पार केला होता, पण या सामन्यामध्ये भारताच्या संघाने शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर सहज लक्ष्य पार केले. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 43.3 ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली असली तरी, रवींद्र जडेजाने इतिहास रचला. आत जडेजाने कोणती ऐतिहासिक कामगिरी केली आहे यासंदर्भात सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहोत.
अनुभवी फिरकी अष्टपैलू जडेजा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात 10 ओव्हरमध्ये 75 धावा देऊन दोन बळी घेत हा विक्रम आपल्या नावावर केला. 37 वर्षीय जडेजाने आमिर जांगू (114) आणि अल्झारी जोसेफ (9) यांची विकेट घेतली. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यामध्ये रविंद्र जडेजाने 34 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतले. हा रेकॅार्ड याआधी वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शच्या नावावर होता हा २७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. वॉल्शने 1985 ते 1999 दरम्यान भारताविरुद्ध 38 एकदिवसीय सामने खेळून 44 बळी घेतले होते. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/16 ही होती.
आता रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. भारताचे महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 बळी घेतले असून, त्यांची सर्वोत्तम कामगिरी 4/54 ही आहे. त्याचबरोबर अनिल कुंबळे यांचे देखील या यादीमध्ये नाव आहे, आणि मोहम्मद शमीचे नाव देखील या यादीमध्ये आहे मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध 37 विकेट्स घेतले आहेत तो या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताचे गोलंदाज फार काही प्रभाव पाडू शकले नाही. कर्णधार शुभमन गिलने १३३ चेंडूंमध्ये २६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद २३३ धावा केल्या. त्याने ११७ चेंडूंमध्ये २०० धावा पूर्ण करून एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने रोहितसोबत २५५ धावांची सलामीची भागीदारी केली. रोहितने ७५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावा केल्या. दोन पिढ्यांतील या स्टार फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग पूर्ण केला.