SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मैदानात केएल राहुल सोबत ऋषभ पंतचा ब्रोमान्स, Video पाहून तुम्हीही हसू रोखू शकणार नाही

KL Rahul And Rishabh Pant : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टेस्ट सामन्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला नसला तरी ऋषभ पंतने आपल्या कृतींनी प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच केलं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 23, 2026, 22:39 IST | Updated: Nov 23, 2026, 23:14 IST
Image Credit: मैदानात केएल राहुल सोबत ऋषभ पंतचा ब्रोमान्स
Join

KL Rahul And Rishabh Pant : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना ड्रॉ झाला. पाचव्या दिवशी भारतीय संघाला 8 विकेटची गरज होती, तर न्यूझीलंडला सामना ड्रॉ करण्यासाठी संपूर्ण दिवस फलंदाजी करणं गरजेचं होतं. टीम इंडिया तीन विकेट घेऊ शकली मात्र डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने भारताला विजयापासून रोखण्यासाठी शेवटपर्यंत फलंदाजी केली. सामन्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला नसला तरी ऋषभ पंतने आपल्या कृतींनी प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच केलं.

23 नोव्हेंबरला सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि न्यूझीलंड टेस्ट वाचवण्यासाठी फलंदाजी करत होते. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांनी केवळ बचावावर लक्ष केंद्रित करून भारताला विकेट्स घेऊ दिल्या नाहीत. जेव्हा सामना अनिर्णित राहणार असे वाटत होते, तेव्हा कर्णधार शुभमन गिलने आपल्या फलंदाजांना गोलंदाजीवर नेमले, ज्यात स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालचाही समावेश होता.

पंतने जयस्वालला चिडवलं :

ऋषभ पंत हा विकेटकिपर म्हणून विकेट्सच्या मागे उभं राहून काहीवेळा मैदानातील वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचं काम करतो. सध्या ऋषभ पंत हा यशस्वी जयस्वालला चिडवतानाचा एक व्हिडीओ समोर येत आहे. त्याच्या आदल्याच दिवशी, पंतने जयस्वालच्या गोलंदाजीच्या शैलीची थट्टा केली होती. त्याने म्हटले होते की, 'जर कोणाला भयंकर ऍक्शन पाहायची असेल, तर त्यांनी जयस्वालला गोलंदाजी करायला सांगावे'. मात्र यावेळी पंतचे म्हणणं काही वेगळेच होते. जयस्वालने गोलंदाजी सुरू करताच, विकेट्सच्या मागून पंत ओरडला, 'ही आपली संधी आहे! त्याच्या (यशस्वी) विकेटकिपिंगबद्दल मला खात्री नाही, पण तो नक्कीच एक ऑलराऊंडर खेळाडू बनू शकतो आणि तोही अगदी झटपट!'. ऋषभ पंतने असं म्हणून यशस्वी जयस्वालला चिडवण्याचा प्रयत्न केला. काही आठवड्यांपूर्वीच, रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून मैदानात उतरण्यापूर्वी जयस्वाल विकेटकिपिंगचा सराव करताना दिसला होता. वनडे आणि टी20 संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात तो हे करत असल्याचे म्हटले जात होते.

हेही वाचा : नाव न घेता पृथ्वी शॉने युवराज सिंहच्या वडिलांना दिली वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
 

राहुलला किस करण्याचा प्रयत्न :

ऋषभ पंत यशस्वी जयस्वालची थट्टा करण्यापर्यंतच थांबला नाही तर त्याने केएल राहुल सोबत सुद्धा मस्करी केली. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, केएल राहुल लिप बाम लावताना दिसला. पंतलाही तसेच करायचे होते, पण त्याने ग्लोव्हज घातले होते. मग पंतला एक गंमत सुचली आणि तो राहुलला किस करण्यासाठी पुढे सरसावला. राहुल त्याला पाहून मागे सरकला. मग पंत हसला आणि बाजूला झाला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES