आज आशिया कपमध्ये किती वाजता सुरु होणार टीम इंडियाचा सामना? कुठे पाहता येणार? अभिषेक आणि वैभव करणार ओपनिंग
Rising Star Asia Cup 2026 IND VS NEP : राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला सुरुवात झाली असून यातील इंडिया ए संघाचा पहिला सामना आज नेपाळ विरुद्ध रंगणार आहे. तेव्हा हा सामना कधी आणि कुठे पाहता येऊ शकतो याविषयी जाणून घेऊयात.
IND VS NEP : राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 ची दमदार सुरुवात झाली असून यात बांगलादेश आणि श्रीलंका संघ त्यांचे पहिला वहिला सामना जिंकलेत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस असून सर्वात पहिला सामना हा भारतीय संघ नेपाळ सोबत खेळणार आहे. या स्पर्धेत तिलक वर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार असून यात सर्वांचं लक्ष हे वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे असेल.
याआधी ही स्पर्धा इमर्जिंग आशिया कपच्या नावाने ओळखली जायची. मात्र 2025 मध्ये याचं नाव बदलून राइजिंग स्टार्स एशिया कप असं करण्यात आलं. भारतीय संघ 2013 नंतर ही स्पर्धा जिंकू शकलेली नाही. मात्र नेपाळला हरवून आज टीम इंडिया 13 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्यासाठी पहिलं पाऊल टाकू शकते. तेव्हा आज 20 नोव्हेंबर 2026 रोजी इंडिया ए आणि नेपाळ यांच्यात होणारा राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 चा सामना कुठे पाहू शकता याविषयी जाणून घेऊयात.
कुठे आणि कधी पाहू शकता सामना?
इंडिया ए विरुद्ध नेपाळ सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. इंडिया ए विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा सोनी लिव्ह अँप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तर टीव्हीचं लाईव्ह टेलिकास्ट हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.
हेही वाचा : ग्लेन फिलिप्सचं ऐतिहासिक शतक, भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
इंडिया ए चा संघ :
तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव, अरशद खान, आयुष बडोनी
राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये इंडिया ए च्या सामान्यांचं वेळापत्रक :
इंडिया ए विरुद्ध नेपाल : 20 नोव्हेंबर 2026
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए : 22 नोव्हेंबर 2026
इंडिया ए विरुद्ध यूएई : 24 नोव्हेंबर 2026