SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अजून एका मुंबईकराचं टीम इंडियात पदार्पण, आशिया कप सेमी फायनल सामन्यात मिळाली संधी

Rising Star Asia Cup 2026 : इंडिया ए विरुद्ध श्रीलंका सेमी फायनल सामन्यात भारतीय संघात मुंबईच्या स्टार क्रिकेटरचं पदार्पण झालं आहे. युएई सामन्याच्या तुलनेत संघात बदल करून कर्णधार तिलक वर्मा याने 28 वर्षीय तनुष कोटियनला संधी दिली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 15:33 IST | Updated: Nov 26, 2026, 15:54 IST
Image Credit: अजून एका मुंबईकराचं टीम इंडियात पदार्पण, आशिया कप सेमी फायनल सामन्यात मिळाली संधी
Join

Rising Star Asia Cup 2026 : रायनिंग स्टार्स आशिया कप 2026 ही स्पर्धा सध्या कतार येथील दोहा येथे सुरु आहे. येथे 26 नोव्हेंबर रोजी इंडिया ए विरुद्ध श्रीलंका यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जात असून या सामन्यात एका मुंबईकर खेळाडूने टीम इंडियात पदार्पण केलं आहे. सामन्याचा टॉस कर्णधार तिलक वर्माने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजी निवडली. तर श्रीलंकेला प्रथम गोलंदाजीसाठी आव्हान दिलं. या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये टीम इंडियाने फक्त एक बदल केला आणि मुंबईकर 28 वर्षीय गोलंदाजी ऑलराऊंडर असणाऱ्या तनुष कोटियनला संधी मिळाली.

इंडिया ए प्लेईंग 11 मध्ये फक्त एक बदल :

इंडिया ए संघ यासामन्यापूर्वी यूएई संघाचा ग्रुप स्टेजमध्ये दारुण पराभव करून सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. या सामन्यात भारताचा वैभव सूर्यवंशीने 52 बॉलमध्ये अभूतपूर्व अशी 204 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी इंडिया ए विरुद्ध श्रीलंका यांच्यात सेमी फायनल सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल होईल याची शक्यता तशी कमी होती. मात्र टॉस जिंकल्यावर तिलक वर्माने मुंबईकर 28  वर्षीय गोलंदाजी ऑलराऊंडर तनुष कोटियन हा या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले. प्रभसिम्रन सिंहच्या बदल्यात तनुष कोटियन याला इंडिया ए संघात संधी मिळाली. तनुष कोटियन हा मूळचा मुंबईच्या चेंबूर येथील राहणारा असून त्याचा जन्म देखील तिथेच झाला. तो मुंबई क्रिकेट संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.  

हेही वाचा : 'या' 6 स्टार खेळाडूंचा गुरु आहे युवराज सिंह, भारतीय संघासाठी करतायत धुवाधार खेळी

इंडिया ए प्लेईंग 11 : 

 

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकिपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, तनुष कोटियन, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान

श्रीलंका प्लेइंग 11 : 

लसिथ क्रोसपुल्ले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (विकेटकिपर), पवन रथनायके (कर्णधार), निपुण धनंजया, जेनिथ लियानागे, वनुजा सहान, विजयकांत व्यासकांत, रविंदू फर्नांडो, लाहिरू समरकून, गरुका संकेत

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES