SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी तुला माझ्या पत्नी सोबत...', LIVE मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर, Video Viral

SA VS AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सीरिज पार पडली जी ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेऊन जिंकली. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर वियान मुल्डर याला प्रेक्षकांकडून एक अश्लील ऑफर मिळाली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 01, 2026, 01:53 PM IST | Updated: Nov 01, 2026, 02:24 PM IST
Image Credit: 'मी तुला माझ्या पत्नी सोबत...' LIVE मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर, Video Viral
Join

SA VS AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात 176 धावांनी दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने फक्त सीरिज नावावर केली नाही तर टेस्ट क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाची बादशाहत सुद्धा हिसकावून घेतली. दक्षिण आफ्रिकेने 2-1 च्या आघाडीने सीरिज जिंकली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 चं स्थान पटकावलं. मात्र या सामन्याच्या शेवटच्या दिवशी असं दृश्य मैदानात पाहायला मिळालं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्सने दक्षिण आफ्रिका ऑलराऊंडर वियान मुल्डरसाठी एक असं गाणं गायलं जे ऐकून क्रिकेटर लाजेनं लाल झाला.

क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर व्हिडीओ व्हायरल :

वियान मुल्डरने दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन टेस्टमध्ये मिळालेल्या विजयात अतिशय महत्वाची भूमिका निभावली. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 115 धावा केल्या. मुल्डरने खेळलेल्या या इनिंग्सचं कौतुक फॅन्सने एक विचित्र आणि अश्लील गाणं गाऊन केलं. घडले असे की बाउंड्रीजवळ फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमधील काही चाहत्यांनी त्याला उद्देशून एक गाणे गायला सुरुवात केली. ही कृती पाहून हा क्रिकेटर हसू रोखू शकला नाही. त्याची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की स्टॅन्डमध्ये बसलेले फॅन्स  वियान मुल्डरसाठी एक इंग्रजी गाणं गात आहेत. याचे शब्द असे आहेत की, 'ओह वियान मुल्डर तू माझ्या आयुष्यातील माझं प्रेम आहेस. ओह वियान मुल्डर मी तुला माझ्या पत्नी सोबत झोपू देईन, ओह वियान मुल्डर मला तुझ्या सारखा लाल  केसांचं मुलं हवं आहे'.  स्पष्टपणे चाहते मुल्डरसोबत थोडी मजा करत होते. गाणे ऐकल्यावर मुल्डरची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहिली नाही; तो हसताना आणि मान डोलवताना दिसला. यामुळे चाहते अधिकच आनंदित झाले, कारण हे गाणे गाण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देशच त्या क्रिकेटपटूकडून काहीतरी प्रतिक्रिया मिळवणे हा होता.

दक्षिण आफ्रिका टेस्टमध्ये नंबर 1 वर :

 

दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सामन्यापूर्वी टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर होती. केप टाऊनमधील विजयासह दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 124 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर दक्षिण आफ्रिकेकडे 122 रेटिंग पॉइंट्स आहेत. न्यूझीलंड 106 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES