SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारताने पाकिस्तानला आणखी एकदा हरवलं! टीम इंडियाची विजयी सुरुवात

बांगलादेशातील ढाका नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि पहिल्याच हाफमध्ये 3 गोल केले आणि टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 05, 2026, 08:13 PM IST | Updated: Nov 05, 2026, 08:26 PM IST
Join

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये लढत पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. टीम इंडियाचा आज पाकिस्तानविरुद्ध फुटबॅाल सामना खेळवण्यात आला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने आणखी एकदा दमदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-2 ने भारताने पराभूत करुन सॅफ चॅम्पियनशिप 2026 च्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.  बांगलादेशातील ढाका नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि पहिल्याच हाफमध्ये 3 गोल केले. या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने दमदार पुनरागमन केले, ते भारताला जिंकण्यापासून रोखू शकले नाहीत. भारताच्या या विजयाचा हिरो सुहेल भट्ट होता, ज्याने सामन्यात 2 गोल केले. या सामन्यामध्ये किपगेननेही गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानविरुद्धच्या या प्रभावी विजयामुळे भारतीय संघाने 'ब' गटात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या गटात भारत, पाकिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. तर, 'अ' गटात यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान यांचा समावेश आहे.

हे ही वाचा

सूर्यकुमार यादवचे नशीब पुन्हा उजळले, 'या' संघाचे सांभाळणार टी20 कर्णधारपद!

तीन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर, पाकिस्तान संघ दुसऱ्या हाफमध्ये पूर्णपणे कायापालट करून मैदानात उतरला. सामन्याच्या नियमित वेळेतील संपूर्ण 90 मिनिटे भारतीय बचावफळीने पाकिस्तानला रोखून धरले होते आणि भारतीय फॉरवर्ड्सना आपली आघाडी वाढवता आली नाही, तरीही खरा थरार स्टॉपेज टाइममध्ये (इंज्युरी टाइम) घडला. जेव्हा असे वाटत होते की भारत हा सामना 3-0 ने सहज जिंकेल, तेव्हा 91 व्या मिनिटाला नजीबुल्लाहने पाकिस्तानचा पहिला गोल केला.

या गोलमुळे पाकिस्तानी खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अथक दबाव आणायला सुरुवात केली. अवघ्या तीन मिनिटांनंतर, 94 व्या मिनिटाला, आलमगीर काझीने आणखी एक गोल करून स्कोअर 3-2 असा केला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये भारत पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात होता, पण अखेरीस, पंचांच्या अंतिम शिट्टीने सुटकेचा निःश्वास सोडला आणि भारताने 3-2 असा रोमांचक विजय थोडक्यात टाळला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES