2027 चा विश्वचषक सुरु व्हायला काही महिने शिल्लक आहेत पण सर्व संघांनी एकदिवसीय आगामी विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे लागले आहे. संघ आधीच तयारीमध्ये व्यस्त आहेत. आज, गुरुवार, 1 ऑक्टोबर, हा एक खूप खास दिवस आहे. आयसीसीने आता एकदिवसीय विश्वचषकाची मोठी घोषणा केली आहे. आता आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 चे वेळापत्रक जाहीर करणार आहे, त्यासाठी आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसी कधी जाहीर करणार याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर विश्वचषक कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सर्व माहिती देखील लाईव्ह स्ट्रिमिंगची दिली आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 नव्या फॅारमॅटमध्ये खेळवला जाणार आहे त्यामुळे आयसीसी लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे. चाहत्यांसाठी तिकीट सोडतही सुरू होईल. विश्वचषकाच्या स्वरूपातही एक मोठा बदल करण्यात आला आहे. याची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी होईल आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी होईल. या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये चौदा संघ सहभागी होणार आहेत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यजमान संघ आहेत त्यामुळे हे दोन्ही संघ आधीच या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर ज्या संघाची आयसीसी रॅंकिंगमध्ये टॅाप आठ संघ हे स्पर्धामध्ये आधीच पात्र ठरणार आहेत.
आयसीसी रॅंकिंगच्या आधारे भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ आधीच रॅंकिंगच्या आधारावर संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. 2027 च्या सुरुवातीला पात्रता सामने आयोजित केले जातील, ज्यात वेस्ट इंडिज संघही सहभागी होईल. एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत सर्वात कमी मानांकन असलेल्या तीन संघांमध्ये सामने होतील. अव्वल संघ गट फेरीत प्रवेश करेल, तर उर्वरित संघ स्पर्धेतून बाहेर पडतील. त्यानंतर 12 संघांना प्रत्येकी सहा संघांच्या गटांमध्ये विभागले जाईल.
एकदिवसीय विश्वचषक 2027 हा 1 ऑक्टोबर रोजी 8.30 वाजता वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. भारतामध्ये या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तसेच जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर थेट स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. चाहते भारत-पाकिस्तान सामन्याबद्दलही उत्सुक आहेत. हे दोन्ही संघ अनेकदा एकाच गटात ठेवले जातात. यावेळी स्वरूप बदलले आहे आणि ते एकाच गटात असतील की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. आयसीसी केप टाऊनमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 12 यजमान मैदानांवर या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे या स्पर्धेमध्ये 57 सामने खेळवले जाणार आहेत.