SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या कुटुंबासोबत गैरवर्तवणूक, क्रिकेटरने स्वतः पोस्ट करून केले गंभीर आरोप

श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारा याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. संगकाराच्या कुटुंबासोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 29, 2026, 12:37 PM IST | Updated: Oct 29, 2026, 01:10 PM IST
Image Credit: राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या कुटुंबासोबत गैरवर्तवणूक, क्रिकेटरने स्वतः पोस्ट करून केले गंभीर आरोप
Join

Cricketer Kumar Sangakara Family : श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच कुमार संगकारा याच्या कुटुंबाशी गैरवर्तवणूक आणि भेदभाव झाल्याचा आरोप लावला आहे. दिग्गज क्रिकेटरच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबाला गैरवागणूक देण्यात आली, तसेच धमकी दिल्याप्रमाणे संवाद साधला गेला. कुमार संगकाराने एक्स अकाउंटवर स्वतः या घटनेबाबत माहिती दिली.

कुमार संगकारा एक्सवर काय लिहिले?

कुमार संगकारा यांनी एक्सवर लिहिले की, 'डब्लिनमध्ये रायनएअरच्या गेटवरील कर्मचाऱ्यांकडून भेदभावपूर्ण वागणूक मिळाल्याचा अनुभव कोणाला आला आहे का? माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत नुकताच असा प्रकार घडला, जो अत्यंत धक्कादायक होता'.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारा म्हणाला की त्यांची बोलण्याची टोन अशी होती की जसं ते धमकी देत आहेत. त्यांनी लिहिले की, 'त्यांची बोलण्याची पद्धत, कार्यपद्धतींची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी आणि त्यांची धमकीवजा वर्तणूक हे सर्व कोणत्याही प्रवाशासाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे.डब्लिनमधील माझा हा पहिलाच नकारात्मक अनुभव आहे'.

हेही वाचा : WPL 2027 ऑक्शननंतर सर्व 5 संघातील खेळाडूंची संपूर्ण लिस्ट, पहा एका क्लिकवर

 

कुमार संगकारा कारकीर्द :

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 134 टेस्ट, 404 वनडे आणि 56 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 12400 धावा, एकदिवसीय सामन्यांत 14234 धावा आणि टी20 सामन्यांत 1382 धावा आहेत. त्याने टेस्ट 38 शतके आणि वनडे सामन्यांत 25 शतक ठोकली आहेत. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक असलेले संगकारा यांनी आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये पहिल्या सीजनपासून ते 2010 पर्यंत कुमार संगकारा हा पंजाब किंग्ससाठी खेळला होता. त्यानंतर तो डेक्कन चार्जेससाठी खेळला. त्यानंतर दोन सीजन तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आणि 2013 मध्ये सनरायजर्स हैदराबादमध्ये गेला. कुमार संगकारा 2021 ते 2024 दरम्यान राजस्थान रॉयल्सचा हेड कोच होता. त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये त्याला पुन्हा एकदा अपॉईंट करण्यात आले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES