SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हार्दिक पांड्याच्या येण्याने पंजाब किंग्सला कसा होणार फायदा? काय म्हणाला कोच रिकी पॉन्टिंग?

हार्दिक पांड्या आयपीएल 2027 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार राहिलेला ऑलराऊंडर हार्दिक हा खेळाडू म्हणून पंजाब किंग्समध्ये ट्रेड झालाय. तेथे त्याला नेतृत्वाची संधी मिळणार नाहीये. मात्र त्याच्या येण्याने संघाला नेमका कोणता फायदा झाला याबाबत हेड कोच रिकी पॉन्टिंगने सांगितलं आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 21, 2026, 07:48 IST | Updated: Nov 21, 2026, 08:29 IST
Image Credit: हार्दिक पांड्याच्या येण्याने पंजाब किंग्सला कसा होणार फायदा? काय म्हणाला कोच रिकी पॉन्टिंग?
Join

IPL 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा आयपीएल 2027 पूर्वी ट्रेड होऊन मुंबई इंडियन्समधून पंजाब किंग्सकडे गेला आहे. त्यामुळे आगामी सीजनमध्ये हार्दिक पांड्या हा पंजाब किंग्सकडून खेळताना दिसेल. हार्दिकच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेलेला आहे. हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये येण्याने संघाला फायदा होणार का? यावर हेड कोच रिकी पॉन्टिंगने उत्तर दिले.

काय म्हणाला रिकी पॉन्टिंग?

पंजाब किंग्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंगने सांगितलं की हार्दिकच्या येण्याने संघ आता ऑलराऊंडर बनला आहे. हार्दिक त्या मोजक्या ऑलराउंडर्समध्ये सामील आहे जो टी20 फॉरमॅटच्या सामन्यात एक गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका निभावू शकतात. तो पूर्ण 4 ओव्हर टाकू शकतो. त्यामुळे संघाकडे एक अतिरिक्त फलंदाज जास्त खेळवण्याचा पर्याय मिळू शकतो.

मेगा ऑक्शनमध्ये अधिकतर खेळाडू राहिले सोबत :

जिओ हॉटस्टारशी बोलताना रिकी पॉन्टिंगने सांगितलं की, 'पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा-लिलावापर्यंतच्या या तीन वर्षांच्या कालावधीत, आमच्या संघाचा मुख्य गाभा एकत्र राहील, याची मी नेहमीच खात्री केली आहे. म्हणूनच आम्ही आयपीएल 2027 च्या आधी सहा खेळाडूंना मुक्त करण्याचा आणि 19 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे'.

हेही वाचा : भारतीय खेळाडूवर लागला 8 वर्षांचा बॅन, नेमकं काय घडलं? एशियन गेम्समध्ये 72 वर्षांनी जिंकून दिलं होतं पदक

हार्दिकच्या येण्याने संघाला कसा झाला फायदा?

रिकी पॉन्टिंगने म्हटलं की, 'आम्ही ट्रेडद्वारे हार्दिक पांड्याला आमच्या संघात सामील केले. तर अर्शदीप सिंहला दुसऱ्या संघात पाठवले. आता आमच्याकडे एक संतुलित संघ आहे. आमच्या संघात किती ऑलराऊंडर आहेत याबाबत आता चर्चा सुरु आहे. पांड्याच्या येण्यानंतर आमच्याकडे ऑलराउंडरची चांगली फळी आहे. ज्यात मार्को यानसन, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, (सूर्यांश) शेडगे, शशांक सिंह आणि कूपर कोनोली सारखे खेळाडू आहेत. याचा आम्हाला मोठा फायदा होईल. मग ते फिरकी गोलंदाजी करणारे ऑलराऊंडर खेळाडू किंवा वेगवान गोलंदाजी करणारे ऑलराऊंडर खेळाडू आम्ही जवळपास सर्वच आघाड्यांवर तयारी पूर्ण केली आहे'.

हार्दिक पांड्याचं आयपीएल करिअर कसं राहिलं?

हार्दिक पांड्याने आयपीएल करिअरमध्ये 162 सामने खेळले असून यात त्याने 150 इनिंगमध्ये 2955 धावा केल्या आहेत. . यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील हाय स्कोअर 91 धावा असा राहिला असून 116 इनिंगमध्ये गोलंदाजी करताना त्याने 82 विकेट घेतले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES