टीम इंडिया चॅम्पियन...! मोहित उल्वाने पाकिस्तानचा हिसकावला विजयाचा घास , आशिया कप विजेतेपद केले नावावर
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कप 2026 चा अंडर 19 संघाने पाकिस्तानला 1 विकेट्सने पराभूत करुन विजेतेपद नावावर केले आहे. या सामन्यामध्ये मोहित उल्वा आणि मनल चौहान यांनी धूमाकुळ घातला आणि पाकिस्तानचा विजयाचा खास हिसकावला.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने बदल पूर्ण केला आहे, या सामन्यात भारताची मधली फळी पूर्णपणे अपयशी झाल्यानंतर टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे खालच्या फळीतील मनल चौहान आणि मोहित उल्वा यांनी कमालीची फलंदाजी केली आणि टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. भारताच्या संघाने अंडर 19 संघाचा आशिया कप 2026 च्या फायनलच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 1 विकेट्सने पाकिस्तानला पराभूत करुन विजेतेपद नावावर केले आहे, या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 9 विकेट्स गमावून 337 धावा 50 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध अटातटीचा सामना पाहायला मिळाला, या फायनलच्या सामन्यामध्ये मनल चौहानची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. भारताचा सलामीवीर फलंदाज आणि टीम इंडियाचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले. तर आणखी एकदा लक्ष्य रायचंदानी याने देखील अर्धशतकीय खेळी खेळली.
मनल चौहान आणि मोहित उल्वाची ऐतिहासिक खेळी
अन्वय द्रविडची विकेट गेल्यानंतर टीम इंडियासाठी कोण धावा करणार असा प्रश्न होता. मनल चौधरी आणि मोहित उल्वा यांची भागिदारी फायनलच्या सामन्यामध्ये निर्णायक ठरली. मनल चौधरीने संघासाठी 32 चेंडूमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 3 चौकार मारले. तर मोहित उल्वाने संघासाठी कमालीची नाबाद खेळी खेळली, मोहित उल्वाने संघासाठी फायनलच्या सामन्यामध्ये 26 चेंडूमध्ये 49 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले.
हे ही वाचा
IND vs NZ पाचव्या सामन्याआधी टीम इंडिया मोठा धक्का! निर्णायक सामन्याआधी मुख्य गोलंदाज बाहेर
आर्यवीर सेहवागने फायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध 61 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 9 चौकार मारले. भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी याने संघासाठी 101 चेंडूमध्ये 80 धावा केल्या.