SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न आयपीएलमध्ये संधी मिळाली न टीम इंडियात, अंडर 19 वर्ल्ड कप हिरोने अखेर जाहीर केली निवृत्ती

भारताचा अंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेटर बाबा अपराजितने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. 32 वर्षीय क्रिकेटरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली होती, मात्र त्याला ना टीम इंडियात ना आयपीएलमध्ये संधी मिळाली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 16:17 IST | Updated: Nov 26, 2026, 17:36 IST
Image Credit: न आयपीएलमध्ये संधी मिळाली न टीम इंडियात, अंडर 19 वर्ल्ड कप हिरोने अखेर जाहीर केली निवृत्ती
Join

Baba Aparajith Retirement : तामिळनाडूचा माजी कर्णधार बाबा अपराजितने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने यासह आपल्या 15 वर्षांचं करिअर समाप्त केलं असून त्याने आपल्या करिअरमध्ये अंडर 19 स्तरावर भारताचा प्रतिनिधित्व केलं होतं. अपराजितने एकूण 102 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून 32 वर्षीय क्रिकेटरने आपल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूसाठी क्रिकेट खेळून आपली ओळख बनवली आहे. त्यानंतर 2024-25 मध्ये तो केरळला गेला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी गेला. बाबा अपराजितचा भाऊ बाबा इंद्रजित सुद्धा क्रिकेटर आहे.

बाबा अपराजितच्या नावावर 20 शतक :

बाबा अपराजितने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सांगितलं की तो आता कोचिंगमध्ये आपलं करिअर बनवण्यावर लक्ष ठेवेल. यासह तो तामिळ भाषेत कॉमेंट्री सुद्धा करतो. अपराजितने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून 20 शतकं झळकावली आहेत. तो तमिळनाडूच्या अशा तीन संघांचा भाग होता ज्यांनी विजेतेपदे पटकावली होती; यामध्ये 2017-18 मधील विजय हजारे ट्रॉफी, तसेच 2020-21आणि 2021-22 मधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांचा समावेश आहे.

हेही वाचा : अजून एका मुंबईकराचं टीम इंडियात पदार्पण, आशिया कप सेमी फायनल सामन्यात मिळाली संधी

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये केलं दमदार प्रदर्शन :

भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप 2012 मध्ये बाबा अपराजित हा खेळाडू पहिल्यांदा चर्चेत आला. तिथे त्याने 171 धावा केल्या आणि आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीद्वारे पाच विकेट घेतले. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' (सामनावीर) म्हणून निवडण्यात आले. 2015 मध्ये त्याची इंडिया ए संघातही निवड झाली होती. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचा भाग होता परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

कसं होतं बाबा अपराजितचं करिअर?

बाबा अपराजितने 102 फर्स्ट क्लास सामन्यात 5199 धावा, 12 शतकं आणि 75 विकेट घेतले. 114  लिस्ट ए सामन्यात त्याने 4278 धावा 8 शतकं आणि 83 विकेट घेतल्या. बाबा अपराजितने 63 टी20 सामने खेळले असून यात 1147 धावा केल्या आहेत. तर टी20 सामन्यात त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES