एक ओव्हर, 6 षटकार... वैभव सूर्यवंशीचे सर्वात मोठे स्वप्न! खास व्हिडिओमध्ये गुपित केले उघड
इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. जेव्हापासून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे तेव्हापासून त्याला भावी स्टार मानले जात आहे. आता वैभवने आपले सर्वात मोठे स्वप्न उघड केले यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या आधी भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आयर्लंडविरुद्ध मालिकेमध्ये त्याला भारतीय संघामध्ये जागा मिळाली होती पण त्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. जेव्हापासून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे तेव्हापासून त्याला भावी स्टार मानले जात आहे. आता वैभवने आपले सर्वात मोठे स्वप्न उघड केले यासंदर्भात सविस्तर वाचा.
स्टार स्पोर्टसने नुकतीच टीम इंडियाचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीतील एक व्हिडिओ वैभव सूर्यवंशीचा व्हायरल होत आहे यामध्ये वैभवसमोर सहा वेगवेगळ्या कामगिरींची एक क्रमवारी सादर केली आणि त्याला विचारले की तो कोणत्या कामगिरीला क्रमांक देईल. वैभवने सांगितले की, एका ओव्हरमध्ये सहा चेंडूवर सहा षटकार मारणे हे त्याचे स्वप्न आहे. हे त्याचे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे स्वप्न असल्याचे वैभव सूर्यवंशीने सांगितले. वैभवने अनेक रेकॅार्ड त्याच्या नावावर केले आहेत टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात जलद शतकाला दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे आणि त्याला हा विक्रमही साधायचा आहे.
त्याने तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके मारण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याचबरोबर भारताला शेवटच्या चेंडूवर संघाला सामना जिंकून देणे हे ध्येय त्याने पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. क्रिकेटच्या इतिहासाचा भाग बनलेला एक ऐतिहासिक झेल घेणे हे त्याचे सहावे झेल आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही.
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसले. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होता आणि त्याने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि या बदलामुळे फलंदाजीच्या क्रमात काही महत्त्वपूर्ण बदल झाले. तथापि, वैभवची कामगिरी विशेष प्रभावी ठरली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये तो केवळ 53 धावाच करू शकला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका आज, 6 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळेल की नाही, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.