UAE विरुद्ध सामन्याआधी 'या' दिग्गजाकडून वैभव सूर्यवंशीने घेतल्या टिप्स! पहा Video
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध झालेल्या सामन्याआधी एक दिग्गज खेळाडूकडून त्याने काही महत्त्वाच्या टिप्स घेतल्या आणि त्याने त्याच्या फलंदाजीचे रहस्य उघड केले आहे. त्याचा नवा व्हिडिओ सोशल मिडियावर बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारत अ विरुद्ध यूएई यांच्यामध्ये ग्रुप स्टेजचा पहिला सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने एकतर्फी सामना जिंकला. भारताच्या संघाने यूएईच्या संघाला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने ज्याप्रकारे कामगिरी केली त्याच्या खेळीची चर्चा जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध सामन्यामध्ये अनेक रेकॅार्ड मोडले आणि त्याने संघासाठी 53 चेंडूमध्ये 204 धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध झालेल्या सामन्याआधी एक दिग्गज खेळाडूकडून त्याने काही महत्त्वाच्या टिप्स घेतल्या आणि त्याने त्याच्या फलंदाजीचे रहस्य उघड केले आहे.
बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे यामध्ये त्याने यूएईविरुद्ध सामन्याआधी तो खुप त्रस्त होता असे त्याने सांगितले. मागील दोन सामन्यामध्ये खराब कामगिरीनंतर त्याने सांगितले की, एक माजी भारतीय क्रिकेटपटू, ज्याच्याशी वैभवने एक दिवस आधी अर्धा तास संवाद साधला होता, त्यानेही त्याच्या या विक्रमी खेळीत योगदान दिले. द्विशतक झळकावण्याच्या एक दिवस आधी वैभव सूर्यवंशीने ज्या व्यक्तीसोबत बराच वेळ संवाद साधला होता, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून युवराज सिंग होती. एकाच सामन्यात अनेक जागतिक विक्रम मोडल्यानंतर वैभवने स्वतःच हा खुलासा केला.
हे ही वाचा
आर्यवीर सेहवागची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री, बेस प्राइज किती पाहिलत का?
बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीची मुलाखत शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, तो चार लोकांशी बोलला होता: त्याचे वडील, त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा, त्याचा 19 वर्षांखालील खेळाडू मित्र प्रथम जाचक आणि युवराज सिंग. भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंग यांच्याशी त्याने संवाद साधला, त्याने अर्धा तास युवराज सिंगशी संवाद साधला. यावेळी युवराज सिंगने त्याला काही बॅटींगच्या महत्त्वाच्या टिप्स दिल्या, यावेळी वैभवने देखील युवराजला त्याच्या काय समस्या फलंदाजीच्या वेळी येत आहेत यासंदर्भात सांगितल्या.
पुढे वैभव म्हणाला की, मी त्यांना जे जे प्रश्न केले होते ते त्यांनी अर्धा तास मला फलंदाजीच्या संदर्भात समजावून सांगितले. त्यांनी मला सांगितले की, जर मी 20 चेंडू खेळलो, तर धावसंख्या वेगळी असेल आणि त्यांनी मला अनेक तांत्रिक गोष्टीही सांगितल्या, ज्यामुळे मला आज मदत झाली. वैभवने या सामन्यामध्ये 204 धावांची खेळी खेळली आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.