SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक, 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीची कमाल

बेबी बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. त्याने सर्वात वेगवान द्विशतक ठोकलं असून फक्त 52 बॉलमध्ये 200 हून अधिक धावा केला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 24, 2026, 17:15 IST | Updated: Nov 24, 2026, 18:08 IST
Image Credit: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक, बेबी बॉसची कमाल
Join

Vaibhav Sooryavanshi Double Century : रायजिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत विरुद्ध यूएई यांच्यात ग्रुप स्टेज सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 बॉलमध्ये द्विशतक ठोकलं आहे. हे लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक असून हे द्विशतक ठोकताना वैभवने 28 सिक्स आणि 7 चौकार मारले आहेत. तर याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने 28 बॉलमध्ये वेगवान शतक सुद्धा ठोकलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा बेबी बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. यासह भारताने अवघ्या 14.2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून विजयाचे आव्हान पूर्ण केले. 

 सर्वात वेगवान द्विशतक :

वैभव सूर्यवंशीने सलामी फलंदाजीसाठी आल्यावर तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने २८ बॉलमध्ये 14 षटकार आणि 4 चौकारांसह 103 धावांची खेळी करून शतक ठोकले. मात्र तो इतक्यावरच थांबला नाही आणि त्याने हीच खेळी कायम ठेऊन 52 बॉलमध्ये 28 षटकार आणि 7 चौकारांसह 204 धावांची खेळी करून द्विशतक झळकावलं. वैभव सूर्यवंशीने ठोकलेलं हे शतक आणि द्विशतक आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान होतं. यासह पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. याकामगिरीनंतर वैभववर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


इंडिया ए प्लेईंग 11 : 

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकिपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान

यूएई प्लेईंग 11 : 

आर्यांश शर्मा, अंश टंडन, हरप्रीत सिंग भाटिया, मुहम्मद शाहदाद, एम आफताब आलम (विकेटकिपर), तुळस हमीद (कर्णधार), इथन डिसूझा, उद्दीश सुरी, इब्रार अहमद, सिमरनजीत सिंग, जाहिद अली
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES