भारत अंडर 19 विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 यांच्यामध्ये आशिया कप 2026 फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आर्यवीर सेहवागने संघासाठी कमालीची कामगिरी केली. आर्यवीर सेहवाग हा स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले, त्याच्या या कामगिरीनंतर जगभरामध्ये सर्वजण त्याचे कौतुक करत आहे. मागील काही काळापासून वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने त्याच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. या त्याच्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा सर्वात युवा आणि स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली आहे.
वैभव सूर्यवंशी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहार संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. तर दुसरीकडे काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अटातटीचा सामना पार पडला. भारताच्या संघाने एक विकेटने पाकिस्तान फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करुन विजेतेपद नावावर केले. या सामन्यामध्ये विजयाचे नायक मोहित उल्वा आणि मनल चौधरी हे दोघे ठरले. टीम इंडियाने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर वैभवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ज्युनियर भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या आर्यवीर सेहवागचे कौतुकही केले. त्याने एका स्टोरीमध्ये लिहिले, "अभिनंदन! काय जबरदस्त सामना होता."
हे ही वाचा
भारतीय अंडर 19 संघाचे अभिनंदन केल्यानंतर त्याने आर्यवीर सेहवागचा देखील फोटो शेअर केला आहे. आर्यवीर सेहवागचा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन लिहिले, "स्टार बॉय आर्यवीर सेहवाग." सोशल मिडियावर आर्यवीर सेहवागचे कौतुक केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सर्व क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करत 9 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. भारताच्या संघाने हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजेतेपद नावावर केले. मधल्या फळीतील फलंदाज फेल झाल्यानंतर एके वेळी भारतीय संघ अडचणीत सापडल्यासारखा वाटत होता, पण अखेरीस मोहितने 26 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 49 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सेहवागने या सामन्यात 61 चेंडूंमध्ये नऊ चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने 101 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.