SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'स्टार बॉय...' आर्यवीर सेहवाग सर्वोत्तम खेळाडू ठरल्यानंतर वैभव सूर्यवंशीने केली खास पोस्ट!

मागील काही काळापासून वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने त्याच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. या त्याच्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा सर्वात युवा आणि स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 15, 2026, 02:41 PM IST | Updated: Nov 15, 2026, 02:54 PM IST
Join

भारत अंडर 19 विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 यांच्यामध्ये आशिया कप 2026 फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आर्यवीर सेहवागने संघासाठी कमालीची कामगिरी केली. आर्यवीर सेहवाग हा स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले, त्याच्या या कामगिरीनंतर जगभरामध्ये सर्वजण त्याचे कौतुक करत आहे. मागील काही काळापासून वीरेंद्र सेहवाग यांचा  मुलगा आर्यवीर सेहवागने त्याच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. या त्याच्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा सर्वात युवा आणि स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहार संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. तर दुसरीकडे काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अटातटीचा सामना पार पडला. भारताच्या संघाने एक विकेटने पाकिस्तान फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करुन विजेतेपद नावावर केले. या सामन्यामध्ये विजयाचे नायक मोहित उल्वा आणि मनल चौधरी हे दोघे ठरले. टीम इंडियाने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर वैभवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ज्युनियर भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या आर्यवीर सेहवागचे कौतुकही केले. त्याने एका स्टोरीमध्ये लिहिले, "अभिनंदन! काय जबरदस्त सामना होता."

हे ही वाचा

U19 आशिया कपमध्ये आर्यवीर सेहवागची तुफानी फलंदाजी; सर्वाधिक धावा करत रचला इतिहास

भारतीय अंडर 19 संघाचे अभिनंदन केल्यानंतर त्याने आर्यवीर सेहवागचा देखील फोटो शेअर केला आहे. आर्यवीर सेहवागचा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन लिहिले, "स्टार बॉय आर्यवीर सेहवाग." सोशल मिडियावर आर्यवीर सेहवागचे कौतुक केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सर्व क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करत 9 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. भारताच्या संघाने हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजेतेपद नावावर केले. मधल्या फळीतील फलंदाज फेल झाल्यानंतर एके वेळी भारतीय संघ अडचणीत सापडल्यासारखा वाटत होता, पण अखेरीस मोहितने 26 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 49 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सेहवागने या सामन्यात 61 चेंडूंमध्ये नऊ चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने 101 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES