वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाचीही मैदानात चमकदार कामगिरी, विस्फोटक खेळी करत ठोकलं शतक
वैभव सूर्यवंशीचा लहान भाऊ आशिर्वाद सूर्यवंशीने 107 धावांची शतकी खेळी. वैभव सूर्यवंशी काल झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात स्वस्तात बाद झाला, मात्र दुसऱ्या ठिकणी आशिर्वाद सूर्यवंशीने एका लोकलं स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत शतकीय कामगिरी केली.
Vaibhav Sooryavanshi Brother Ashirwad Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 4 धावा करून बाद झाला. त्यामुळे चाहत्यांची सुद्धा निराशा झाली, परंतु वैभव सूर्यवंशीच्या भाऊ आशीर्वाद सूर्यवंशीने मात्र मैदानात जबरदस्त फलंदाजी करून कहर केला. आशिर्वादने 107 धावांची शतकी खेळी केली, ज्यामुळे त्याच्या संघाला 2 विकेट राखून विजय मिळवण्यात मदत झाली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनीही सोशल मीडियावर धावसंख्येबाबत पोस्ट टाकून माहिती दिली. आशीर्वादने 87 बॉलमध्ये नाबाद 107 धावांची खेळी करत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने 14 चौकार आणि 4 सिक्स लगावले. विशेष म्हणजे आशीर्वादच्या संघातील 10 खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. परंतु इतर 9 फलंदाजांपैकी कोणीही 20 धावांचा टप्पाही गाठू शकले नाही.
मोठ्या भावाने शेअर एकला फोटो :
मोठा भाऊ उज्जवल सूर्यवंशीने आशीर्वादच्या बॅटिंग आणि शतकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. वैभव सूर्यवंशीने भारतीय संघाकडून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. वैभव आणि आशीर्वाद या दोघांची बॅटिंग स्टाईल वेगवेगळी आहे. वैभव डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि फिरकी गोलंदाजीही करतो, तर आशीर्वाद उजव्या हाताचा फलंदाज असून मध्यम गतीने गोलंदाजी करतो.
हेही वाचा : 'सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा,' शिवसेना नेते आणि मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार
वैभव सूर्यवंशीला ईशानच्या दुखापतीमुळे मिळाली संधी :
दुसरीकडे वैभव सूर्यवंशीबाबत बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात ईशान किशन हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे वैभवला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली. मात्र तो फक्त 4 धावा करून बाद झाला. BCCI ने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, इशान वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यातूनही बाहेर झाला आहे. परिणामी, तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते; मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला कुमार कुशाग्राकडून तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.