SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

प्लॅनिंग करून वैभव सूर्यवंशीने ठोकल्या 204 धावा, सामन्यानंतर केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने मंगळवारी यूएई विरुद्ध खेळताना 204 धावांची खेळी केली. यावेळी त्याने अनेक रेकॉर्डस् सुद्धा नावावर केले. मात्र ही खेळी खेळण्यापूर्वी त्याने याचं प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळेच तो मोठ्या धावा करू शकला. त्याने सामन्यानंतर बोलताना याविषयी सर्वकाही सांगितलं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 24, 2026, 21:34 IST | Updated: Nov 24, 2026, 22:06 IST
Image Credit: प्लॅनिंग करून वैभव सूर्यवंशीने ठोकल्या 204 धावा
Join

Vaibhav Sooryavanshi : रायजिंग स्टार आशिया कप 2026 मध्ये इंडिया ए आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी केली. वैभवने केवळ 52 बॉलमध्ये 204 धावांची खेळी करून लिस्ट ए मधील सर्वात वेगवान द्विशतक ठोकलं. त्याने लिस्ट ए मधील सर्वात वेगवान शतक सुद्धा ठोकलं जे त्याने 28 बॉलमध्ये पूर्ण केलेलं. याशिवाय वैभवने सर्वात जलद 150 धावा ठोकण्याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावे केला. सामन्याच्यानंतर वैभवने सांगितलं की त्याने हे द्विशतक असंच ठोकलं नाही तर त्यापूर्वी त्याने या मोठ्या खेळीचं  प्लॅनिंग केलं होतं.

सुरुवातीच्या दोन सामन्यात राहिला फ्लॉप :

वैभव सूर्यवंशी हा सुरुवातीच्या दोन सामन्यात फ्लॉप राहिला होता. नेपाळ विरुद्ध पहिल्या ग्रुप स्टेज सामन्यात सुद्धा त्याने 26 धावांची खेळी केलेली तर पाकिस्तान विरुद्ध तो 11 धावा करून बाद झालेला. वैभव म्हणाला की सुरुवातीच्या दोन सामन्यात तो लवकर बाद झाला होता, ज्यामुळे पुढील सामन्यासाठी त्याने चांगला प्लॅन केला.

204 धावांसाठी वैभव सूर्यवंशीने केलेली प्लॅनिंग?

204 धावा ठोकल्यावर वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'गेल्या दोन सामन्यांत मी सेट झालो होतो, पण मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही. त्यामुळे मैदानात उतरल्यावर सुरुवातीला थोडा वेळ घेईन असं प्लॅनिंग केलं होतं. मात्र एक दोन बॉल खेळल्यानंतर माझ्या लक्षात आले की गोलंदाजांना पिचकडून फारशी मदत मिळत नाहीये, म्हणून मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवून खेळण्याचा निर्णय घेतला'.

हेही वाचा : 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीचे तुफान, एकाच सामन्यात केले 7 मोठं रेकॉर्ड, क्रिकेट विश्वात दबदबा

फलंदाजी करताना डोक्यात काय सुरु असतं?

वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'माझ्या मनात काहीही विशेष योजना नव्हती. फक्त एवढाच विचार होता की, जर खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असेल, तर मी संयम राखून दीर्घ खेळी करेन. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. खेळपट्टी चांगली होती आणि बॉल बॅटवर व्यवस्थित येत होता, त्यामुळे मी माझ्या नैसर्गिक शैलीतच फलंदाजी केली'. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES