अंडर 19 आशिया कप फायनलच्या सामन्याला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे, या सामन्यामध्ये भारताचा अंडर 19 संघ हा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताच्या संघाला ग्रुप स्टेजमध्ये एक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे तो पराभव टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध झाला होता. आता भारताचा संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे, यावेळी टीम इंडिया विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरतील. भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी आतापर्यत आर्यवीर सेहवान, लक्ष्य रायचंदानी त्याचबरोबर अर्जुन राजपुत याने फलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे तर गोलंदाजीमध्ये इशान सूदने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारताच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर पाकिस्तानच्या संघाने बांग्लादेशला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताला 151 धावांनी पराभूत करून आपले दुसरे विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि यावर्षी पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकून आपला विक्रम सुधारण्याचा प्रयत्न करेल. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये 101 च्या सरासरीने 303 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तो आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
हे ही वाचा
आशिया कप अंडर 19 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आता, आशिया कप अंडर 19 चा फायनलचा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार 10.30 वाजता होणार आहे, या सामन्याचे नाणेफेक 10.00 वाजता होणार आहे. या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
𝐎𝐍𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐒𝐇𝐎𝐓 𝐀𝐓 𝐆𝐋𝐎𝐑𝐘! India U19 are ready to turn the tables on Pakistan and put the past behind them as they chase Asian Glory! Watch Pakistan vs India in the DP World Men's U19 Asia Cup, TOMORROW 10:30 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #PAKvIND
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 13, 2026
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (विकेटकिपर), आर्यन पटेल, इशान सूद, वी. यशवीर, आर्यन सवसानी.