जिओहॅाटस्टारवर नाही 'येथे' पाहता येणार IND vs PAK सामना! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानशी 8 नोव्हेंबर रोजी भिडताना दिसणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये वाचा.
IND vs PAK Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मागील काही काळामध्ये टीम इंडियाच्या संघाचा सातत्याने दबदबा पाहायला मिळाला आहे. महिला संघाने देखील पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे तर पुरुष संघाचा देखील दबदबा पाहायला मिळाला आहे. डीपी वर्ल्ड पुरुष U19 आशिया कप सुरु आहे मागील सामन्यामध्ये भारतीय अंडर 19 संघाने नेपाळला एकतर्फी पराभूत करुन आता टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे. पुरुष U19 आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्याचे आयोजन हे अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, अल अमेरत येथे होणार आहे, हा सामना क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
कधी आणि कुठे सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 पुरुष U19 आशिया कपचा सामना हा 8 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, अल अमेरत येथे रंगणार आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॅारमॅटमध्ये खेळवली जात आहे, त्यामुळे दोन्ही संघ 50 ओव्हरचा खेळ खेळतील. भारताच्या संघामध्ये काही महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे, टीम इंडियाचे दोन्ही दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची दोघांचे मुले ही या संघाची भाग आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता होणार आहे, या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार 10.00 वाजता मैदानात येतील.
हे ही वाचा
मोहम्मद शमीने अचानक ठोकला कसोटी क्रिकेटला रामराम! सोशल मिडियावर केली निवृत्ती जाहीर
कुठे पाहता येणार सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या 8 नोव्हेंबर रोजी सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्हवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक हा सामना त्यांच्या मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर डिजिटल उपकरणांवर थेट पाहू शकतात.
द्रविड आणि सेहवागचा मुलगा खेळणार
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग हा भारतीय अंडर 19 संघासाठी कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. त्याने नेपाळविरुद्ध झालेल्या मागील सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते. तर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड हा विकेटकिपरची भुमिका साकारत आहे.
टीम इंडियाचा संपूर्ण अंडर 19 संघ
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (विकेटकिपर), रजत बघेल (विकेटकिपर), व्ही. यशवीर, आर्यन उलवीन, आर्यन उलवानी, शवविना पटेल आणि विनित सावंत, इशान सूद.