भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका सुरु आहे या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने संघाला कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे.
मोहम्मद शमीने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अखेरीस, शमीने आपल्या कारकिर्दीबाबत एक मोठे पाऊल उचलले.
1/8
काय म्हणाला मोहम्मद शमी?
पुढे शमी म्हणाला या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या आणि सुख-दुःखात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे, प्रशिक्षकाचे, कुटुंबीयांचे आणि लाखो भारतीयांचे मी मनःपूर्वक आभार मानतो." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
काय म्हणाला मोहम्मद शमी?
आपल्या भावनिक संदेशात तो पुढे म्हणाला, "कसोटी क्रिकेट माझ्यासाठी कधीच केवळ एक प्रकार नव्हता; तो माझ्या आयुष्याचा एक खूप खास भाग राहिला आहे. आज, जड अंतःकरणाने आणि असंख्य गोड आठवणींसह, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
काय म्हणाला मोहम्मद शमी?
जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय कसोटी जर्सी घातली, तेव्हा माझे एकच स्वप्न होते: माझ्या देशासाठी काहीतरी करून दाखवणे. तेव्हापासून आजपर्यंत, प्रत्येक विकेट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत आणि प्रत्येक पुनरागमनाने मला काहीतरी शिकवले आहे." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवरून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवरून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने एक भावपूर्ण संदेश शेअर केला, ज्यात तो म्हणाला, "मी पांढऱ्या जर्सीला निरोप देत आहे, पण तिच्याशी निगडित आठवणींना कधीच नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
शमीने अचानक कसोटी क्रिकेटला ठोकला रामराम
शमीने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम ठोकून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, चांगली कामगिरी करूनही निवड समितीने त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. अखेरीस, शमीने आपल्या कारकिर्दीबाबत एक मोठे पाऊल उचलले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा
मोहम्मद शमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. शमीने लिहिले की, तो पांढऱ्या जर्सीला निरोप देत आहे, पण तिच्या आठवणींना कधीही नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघाबाहेर होता. त्याने आता मोठी घोषणा सोशल मिडियावर केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
64 कसोटी सामन्यांमध्ये 229 बळी
13 वर्षांपूर्वी याच दिवशी शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने 64 कसोटी सामन्यांमध्ये 229 बळी घेतले आहेत. शमीने आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया