IND vs PAK आशिया कपसाठी होणार महामुकाबला! टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज...
सेमीफायनलच्या संघामध्ये विजयी झालेले संघ आता आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये एकमेंकांच्या विरोधात खेळताना दिसणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा फायनलचा सामना कधी कुठे खेळवला जाणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. टीम इंडिया आता पाकिस्तानच्या संघाविरुद्ध बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अंडर 19 आशिया कप सेमीफायनलचे सामने आज पार पडले, पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तानने बाजी मारली तर दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारताने अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. सेमीफायनलच्या संघामध्ये विजयी झालेले संघ आता आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये एकमेंकांच्या विरोधात खेळताना दिसणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा फायनलचा सामना कधी कुठे खेळवला जाणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अंडर 19 आशिया कप 2026 चा मुकाबला साखळी सामन्यांमध्ये म्हणजेच ग्रुप स्टेजमध्ये देखील पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता फायनलच्या सामन्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे, टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये एक सामना मिळवला होता. तर पाकिस्तानच्या संघाने एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे, भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान असणार आहे त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
टीम इंडियाचा 8 विकेट्सने विजय, आशिया कपमध्ये भारताची फायनलमध्ये एन्ट्री!
कधी आणि कुठे पाहता येणार भारत पाकिस्तान सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप 2026 चा फायनलचा सामना हा 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हिशोब चुकता करण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे, या सामन्याच्या नाणेफेकीसाठी 10.00 दोन्ही संघाचे कर्णधार हे मैदानात येतील. या सामन्याचे टेलिव्हिजवर पाहणारे क्रिकेट चाहते हे सोनी स्पोट्स नेटवर्कवर पाहणार आहेत. तर चाहत्यांना हा सामना मोबाईल, लॅपटॅाप किंवा कम्प्यूटरमध्ये देखील पाहता येणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही चाहत्यांना सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताविरुद्ध अफगाणिस्तानने 50 षटकांत 8 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताचा 19 वर्षांखालील कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर यांनी सलामीला एक भक्कम भागीदारी रचत पहिल्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. लक्ष्यने 90 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या, पण त्याचे शतक थोडक्यात हुकले. आर्यवीरने 57 चेंडूंमध्ये चार षटकार आणि तितक्याच चौकारांसह 51 धावा केल्या.