आर्यवीरवर कोणते संघ लावणार बोली? सेहवागच्या मुलाला 'या' फ्रॅन्चायझी बनवू शकतात करोडपती
गोव्यामध्ये 16 डिसेंबर रोजी आयपीएल 2027 चा मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे, या लिलावामध्ये वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने देखील नोंदणी केली आहे. त्याला या सिझनमध्ये कोणती फ्रन्चायझी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
16 डिसेंबर रोजी गोव्यामध्ये आयपीएल 2027 साठी मिनी लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. या लिलावामध्ये अनेक युवा आणि नवीन खेळाडूंचे नावे पाहायला मिळणार आहे, मागील काही दिवसांपासून वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये आर्यवीर सेहवागने सर्वाधिक धावा स्पर्धेमध्ये केल्या आणि संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. आता आर्यवीर सेहवागने आयपीएल 2027 च्या लिलावामध्ये त्याच्या नावाची नोंदणी केली आहे, 2024 मध्ये झालेल्या वैभव सूर्यवंशीवर राजस्थान रॅायल्सने बोली लावली आणि खेळाडूचे नशीब बदलले होते. आता आर्यवीर सेहवागवर कोणता संघ बोली लावू शकतो यासंदर्भात एकदा जाणून घ्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नुकतेच अभिषेक पॅारेल, करुन नायर यांसारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे. आर्यवीर सेहवाग हा दिल्लीचाच आहे तो दिल्लीच्या डोमॅस्टिक संघाकडून देखील खेळला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात विराट कोहलीला करारबद्ध करण्यात अपयश आल्यापासून, फ्रँचायझीने वारंवार युवा खेळाडूंवर लक्ष्य केले आहे. मागील दोन वर्षांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. आगामी सिझनमध्ये सीएसकेच्या संघाने संपूर्ण स्टाफ देखील पूर्णपणे बदलला आहे. आयुष म्हात्रे, डेव्हाल्ड ब्रेविस यांसारख्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे, त्याचबरोबर यंदा एमएस धोनी संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग असणार आहे.
हे ही वाचा
एकही चेंडू न खेळता खेळाडू गोल्डन डकवर आऊट, WBBL मधील विचित्र नियम! पहा Video
कोलकाता नाईट रायडर्सला एका भारतीय सलामीवीराची गरज आहे, मागील सिझनमधील संघाचा कर्णधार अजिंक्य राहणेच्या निवृत्तीनंतर संघाकडे टीम सेफर्ट आणि फिन ॲलन यांच्या रूपात निश्चितच चांगले पर्याय आहेत, परंतु संभाव्य संघ रचना पाहता, त्या दोघांपैकी फक्त एकच अंतिम 11 मध्ये स्थान मिळवू शकते. आता आर्यवीर सेहवाग आगामी सिझनच्या ऑक्शनमध्ये विकला जाणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्यवीरने 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीसह आधीच आपल्या नावाची नोंदणी केली आहे. आर्यवीरसोबत मोहित उल्वानेही नोंदणी केली आहे.
आर्यवीर सेहवागला अंडर 19 संघामध्ये जेव्हापासून स्थान मिळाले आहे तेव्हापासून तो सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे. भारताच्या माजी खेळाडूचा मुलगा असल्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचे त्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष्य पाहायला मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप 2026 मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतके आणि एक शतक ठोकले. 361 धावा करणाऱ्या आर्यवीरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आले होते.