ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग (WBBL) 2026 सुरु आहे, 25 नोव्हेंबर रोजी बुधवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली, त्यानंतर सोशल मिडियावर या विकेटची चर्चा पाहायला मिळत आहे. मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यामधील झालेल्या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजची स्टार अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिन एकही चेंडू न खेळता बाद झाली. पण असे क्रिकेटमध्ये कसे काय शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर घटना या लेखामध्ये तुम्ही वाचा आणि व्हिडिओ पहा.
ब्रिस्बेन हीट संघाची गोलंदाज सारा ग्लेनने यष्टींवर चेंडू मारून तिला त्रिफळाचीत केले. डॉटिन क्रीजवर पोहोचली होती, पण एकही चेंडू न खेळता तिला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले आणि ती गोल्डन डकवर बाद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. महिला बिग बॅश लीगच्या नियमानुसार सारा ग्लेनसा बाद करण्यात आले. डब्ल्यूबीबीएलच्या नियमाबद्दल सांगायचे झाले तर, आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर 75 सेकंदांच्या आत नवीन फलंदाज क्रीजवर असणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास फलंदाजाला "टाइम आऊट" घोषित केले जाते.
हे ही वाचा
टाइम आउट झाल्यानंतर गोलंदाजाला 'फ्री बॉल' मिळतो. या नियमानुसार, फलंदाज यष्टींपासून पाच फूट अंतरावर उभा राहतो, ज्यामुळे गोलंदाजाला कोणत्याही अडथळ्याशिवाय यष्टींवर लक्ष्य साधता येते. डॉटिनचीही अशीच अवस्था झाली. ती दिलेल्या वेळेत क्रीजवर पोहोचू शकली नाही. त्यानंतर सारा ग्लेनने फ्री बॉलवर यष्टींवर लक्ष्य साधून तिला बाद केले. डॉटिन शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. अशाप्रकारे, ग्लेनने तिच्या पहिल्याच चेंडूवर तिची विकेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचा नियम आहे पण बिग बॅश लीगमध्ये या नियमामध्ये फ्री बॉल देखील लागू करण्यात आला आहे.
Extraordinary. Deandra Dottin was late to the middle. Now she's out after Sarah Glenn hit the stumps with a ball she couldn't face! #WBBL12 https://t.co/lsG3SZAw8b
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 25, 2026
सर्वसाधारणपणे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आधीची विकेट पडल्यानंतर जर फलंदाज निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी परत आला नाही, तर विरोधी संघ टाइमआऊटची मागणी करू शकतो. त्यानंतर मैदानातील पंच नियमांनुसार निर्णय घेतात. मात्र, डब्ल्यूबीबीएलमध्ये या परिस्थितीला हाताळण्यासाठी फ्री बॉलचा नियम लागू करण्यात आला आहे. जर नवीन फलंदाज निर्धारित वेळेत क्रीजवर आला नाही, तर फलंदाजाला स्ट्राईक न देता गोलंदाजाला गोलंदाजी करण्याची संधी दिली जाते.