5 दिवसात 3 मेडल... आशियाई खेळांमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी! कोण आहे गुलवीर सिंग?
जपानमध्ये गुलवीर सिंगची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा धावपटू गुलवीर सिंगने या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे, त्याने केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा घ्या.
ॲथलेटिक्समध्ये भारताने आशियाई खेळांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, ट्रक फिल्ड असो किंवा उंच उडी भारताच्या ॲथलेटिक्सने भारताची मान उचवली आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा धावपटू गुलवीर सिंगने या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जपानमध्ये गुलवीर सिंगची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. भारताच्या या स्टार लांब पल्ल्याच्या धावपटूने मंगळवारी पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत 13:32.75 अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. यासह, गुलवीरने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन वेगवेगळ्या ट्रॅक स्पर्धांमध्ये तीन पदके जिंकून त्याने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्याने केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा घ्या.
एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकणारा गुलवीर सिंग हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम महान भारतीय खेळाडू पी. टी. उषा यांच्या नावावर होता हा विक्रम प्रस्थापित होता. पी. टी. उषा यांनी 1986 च्या सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आशियाला चकित केले होते, जिथे त्यांनी एकाच स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. त्या अविस्मरणीय 1986 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर अनेक दशकांनी, गुलवीरने तोच इतिहास पुन्हा रचून भारतीय क्रीडा चाहत्यांना अभिमान बाळगण्यासारखी कामगिरी करून दिली आहे. के.एम. बीनामोल यांनी २००२ च्या बुसान आशियाई खेळांमध्ये तीन पदके जिंकली.
नागोया आशियाई खेळांमधील गुलवीर सिंगचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नव्हता. त्याने अवघ्या पाच दिवसांत चार खडतर शर्यतींमध्ये भाग घेऊन आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक सामर्थ्य दाखवून दिले. 1500 मीटरपासून ते 10,000 मीटरपर्यंत, गुलवीरने भाग घेतलेल्या प्रत्येक अंतराच्या शर्यतीत पदक मिळवले. त्याने फक्त आशियाई खेळांमध्येच नाही तर ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही इतिहास रचला. या स्पर्धेमध्ये देखील त्याने दोन मेडल नावावर केले होते. याशिवाय, गुलवीरने गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील गुमी येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५००० मीटरमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे.
कोण आहे गुलवीर सिंग?
अलीगढच्या छर्रा भागातील सिरसा गावचा आंतरराष्ट्रीय धावपटू गुलवीर सिंग याने सलग पाचवे पदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे. त्याच्या यशामुळे सिरसा येथील त्याच्या कुटुंबाला आणि गावाला आनंद झाला आहे. गावकऱ्यांनी गुलवीरच्या कुटुंबाचे अभिनंदन करण्यासाठी आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाई देण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली. गावकऱ्यांनी सरकारने गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे अशी मागणीही केली आहे.