आयसीसीची मोठी घोषणा! क्वालिफायर सामने 'या' देशात होणार, 8 संघ एकमेकांशी भिडणार
आता आयसीसीने क्वालिफायर सामन्यासाठी ठिकाणाची घोषणा केली आहे, ही स्पर्धा आता नेपाळमध्ये खेळवली जाणार आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 चे आयोजन पुढील वर्षी केले जाणार आहे, या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली या विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत, त्यामधील 10 संघ थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित 4 संघ हे ग्लोबर क्वालिफायर आणि प्लेऑफद्वारे त्याचे स्थान निश्चित केले जाणार आहे. आता आयसीसीने क्वालिफायर सामन्यासाठी ठिकाणाची घोषणा केली आहे, ही स्पर्धा आता नेपाळमध्ये खेळवली जाणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2027 पात्रता फेरीचे प्लेऑफ सामने 6 डिसेंबरपासून नेपाळमध्ये आयोजित केले जातील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले जातील. यजमान नेपाळचा सामना त्रिभुवन युनिव्हर्सिटी क्रिकेट मैदानावर इटलीशी होईल, तर नामिबियाचा सामना मुलापाणी क्रिकेट मैदानावर युगांडाशी होईल. याव्यतिरिक्त, कॅनडा, कुवेत, जर्सी आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांचे संघही या स्पर्धेत सहभागी होतील. आयर्लंड आणि वेस्ट इंडिजने 10 संघांच्या एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
ग्लोबर क्वालिफायरचा विजेता संघ हा हा 10 जे आधीच संघ पात्र ठरले आहेत त्यांच्यासोबत विश्वचषक खेळणार आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या गट टप्प्यात थेट प्रवेश करेल. ग्लोबल क्वालिफायरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ सुपर सिरीजमध्ये प्रवेश करतील. थेट पात्र ठरलेल्या आठ संघांनंतर, हे दोन्ही संघ एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी होते. दरम्यान, अमेरिका, स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि ओमान हे संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधून पात्र ठरले आहेत. नेपाळमधील प्लेऑफमधून आणखी चार संघ या यादीत सामील होतील.
हे ही वाचा
वैभव सूर्यवंशी 'या' संघाचे सांभाळणार कर्णधार, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मोठा निर्णय
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 ची स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी विश्वचषक पाहण्यासाठी तिकीटांना प्रचंड मागणी आहे. "आजपर्यंत तिकिटांसाठी 15 दशलक्ष 83 हजार 752 अर्ज प्राप्त झाले असून, 142 देशांमधील चाहत्यांनी 4.423 दशलक्ष 417 नोंदणी केली आहे," असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.