SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

आता महिला प्रिमियर लीग 2027 चा लिलावासाठी भारतीय संघातील काही महत्त्वाचे खेळाडूंच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता या लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 28, 2026, 03:17 PM IST | Updated: Oct 28, 2026, 03:29 PM IST
Join

WPL 2027 Auction Live Streaming : महिला प्रिमियर लीग 2027 चा पाचवा सिझनला आजपासून सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी 186 खेळाडू उपलब्ध आहे आणि यामधील जास्तीत जास्त 27 खेळाडू खरेदीसाठी पात्र ठरणार आहेत. कारण हा मिनी लिलाव आहे त्यामुळे मग यापैकी 20 खेळाडू भारतीय असणार आहेत तर त्यामधील 7 खेळाडू हे परदेशी असणार आहेत. आता हा लिलावासाठी भारतीय संघातील काही महत्त्वाचे खेळाडूंच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता या लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

पाचव्या हंगामासाठीचा मिनी लिलाव आज, बुधवार, 28 ऑक्टोबर 2026 रोजी कोची येथे होणार आहे. डब्ल्यूपीएल लिलाव प्रक्रिया कोचीमध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना लिलावात एकूण 27 जागा भरायच्या आहेत, त्यापैकी 20 जागा भारतीय खेळाडूंसाठी आहेत.  हा लिलाव कोची येथील ग्रँड हयातमध्ये सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. लिलाव सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय आणि डब्ल्यूपीएल अधिकाऱ्यांची संक्षिप्त भाषणे होतील. हा एक मिनी लिलाव असल्याने, तो केवळ काही तास चालेल.

हे ही वाचा

अभिषेक शर्माने हिसकावले इशान किशनचे पहिले स्थान, ICC ने जाहीर केली नवी क्रमवारी!

कुठे पाहता येणार WPL 2027 लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग?

महिला प्रिमियर लीग 2027 च्या लिलावाचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कला भेट द्यावी लागेल. तुम्ही विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता. जर तुम्ही स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा टॅबलेटवर 2027 डब्ल्यूपीएल लिलाव थेट पाहण्यासाठी, तुम्हाला जिओहॉटस्टार ॲपवर लॉग इन करावे लागेल. तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहण्यासाठी, तुम्हाला हॉटस्टार वेबसाइटवर लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. 

लिलावासाठी सर्वोच्च मूळ किंमत 50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. खेळाडूंची पुढे 40 लाख, 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च मूळ किंमतीच्या गटात केवळ दोन खेळाडू आहेत: इंग्लंडची सोफिया डंकले आणि ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज मॉलिन्यू.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES