SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक, मुंबई इंडियन्सला 3 IPL ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाची एंट्री

WPL 2027 Delhi Capitals : महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत जवळपास तीनवेळा दिल्ली कॅपिटल्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला, मात्र एकदाही त्यांना विजेतेपद जिंकता आले नाही. तेव्हा आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा माजी हेड कोच असलेल्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 20, 2026, 14:03 IST | Updated: Nov 20, 2026, 14:37 IST
Image Credit: दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक, मुंबई इंडियन्सला 3 IPL ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाची एंट्री
Join

WPL 2027 Mumbai Indians : महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा संघ अनेकदा फायनलमध्ये पोहोचला, मात्र त्यांना विजेतेपदाच्या ट्रॉफीने नेहमी हुलकावणी दिली. तेव्हा आता फ्रेंचायझीने पुढील सीजनच्या आधी एका अशा दिग्गजाला आपल्या सोबत जोडले आहे ज्यांचा आयपीएलमध्ये चांगला अनुभव असून मुंबई इंडियन्सला 3 आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आता दिल्ली कॅपिटल्सला नवी दिशा देताना दिसणार असून त्यांना आगामी सीजनसाठी दिल्ली कॅपिटल्सने डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून नियुक्त केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक JSW आणि GMR यांनी महेला जयवर्धनेच्या नियुक्तीची अधिकृतपणे घोषणा केली. जयवर्धने हे क्रिकेट संचालनाची जबादारी सांभाळणार असून याअंतर्गत संघाची रणनीती तयार करणे, नवं टॅलेंट शोधणे, खेळाडूंसोबतच कोचिंग स्टाफच्या विकासावर काम करणं इत्यादीचा यात समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाचा हेड कोच जोनाथन बॅटी आणि कर्णधार जेमिमा रोड्रिग्स यांच्यासोबत महेला जयवर्धने दिल्ली कॅपिटल्सची योजना पुढे नेईल.

मुंबई इंडियन्सला तीनवेळा बनवलं IPL चॅम्पियन :

महेला जयवर्धनेला सर्वात यशस्वी कोचमध्ये गणलं जातं असून मुंबई इंडियन्स सोबत त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्सचा हेड कोच झाला होता. त्याच्या मार्गदर्शनात संघाने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचा खिताब नावावर केला आहे. या दरम्यान मुंबईने फायनलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट, चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले.

हेही वाचा : आज आशिया कपमध्ये किती वाजता सुरु होणार टीम इंडियाचा सामना? कुठे पाहता येणार? अभिषेक आणि वैभव करणार ओपनिंग

2022 मध्ये हेड कोचचं पद सोडल्यावर मुंबई इंडिन्सचा  ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मेंस बनवले होते. या भूमिकेत त्यांनी विविध देशांमधील लीगमध्ये खेळणाऱ्या फ्रँचायझीच्या संघांच्या क्रिकेट कामकाजावर देखरेख ठेवली. 2025 मध्ये महेला जयवर्धने पुन्हा एकदा मार्क बाउचरच्या जागी मुंबई इंडियन्सचा हेड कोच  बनला. मात्र त्यांचा हा दुसरा कार्यकाळ फारसा यशस्वी ठरला नाही. 2025 मध्ये मुंबई संघ 'क्वालिफायर 2' पर्यंत पोहोचला होता. परंतु 2026 मध्ये तो नवव्या स्थानावर राहिले. त्यानंतर फ्रँचायझीने त्यांच्याशी असलेले संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES