बांग्लादेशच्या पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल, भारताला झाला फायदा! वाचा संपूर्ण समीकरण
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेशला हरवल्यानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेमध्ये भारताच्या संघाला त्याचा मोठा फायदा झाला आहे, नक्की समीकरण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने बांग्लादेशला पराभूत केले आणि आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. बांग्लादेश क्रिकेट संघ मायदेशामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, या मालिकेचा पहिला सामना आज पार पडला. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेशला हरवल्यानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेमध्ये भारताच्या संघाला त्याचा मोठा फायदा झाला आहे, नक्की समीकरण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे, या मालिकेचा पहिला सामना पार पडला आणि वेस्ट इंडिजच्या संघाने बांग्लादेशला घरच्या मैदानावर पराभूत केले. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिजच्या या विजयाचा भारतीय संघाला थेट फायदा झाला आहे. बांगलादेशच्या पराभवानंतर, टीम इंडियाने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत 5 व्या स्थानावरून 4 थ्या स्थानावर एक स्थानाची झेप घेतली आहे. यामुळे भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही बळकट झाल्या आहेत. नक्की समीकरण आणि कोणत्या संघाला किती गुण आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
4,4,4,4,4,4,4,4,4,4,4... ध्रुव जुरेलने भारतीय संघाला सावरलं! न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टेकले गुडघे
बांग्लादेशच्या पराभवानंतर डब्ल्यूटीसी 2025-27 गुणतालिकेमध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, या दौऱ्यावर भारतीय कसोटी संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे त्याआधी टीम इंडियाला गुणतालिकेमध्ये फायदा झाला. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्याआधी बांग्लादेशचा संघ 55.56 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान होता, पण त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची गुण टक्केवारी 47.62 पर्यंत घसरून ते पाचव्या स्थानावर आले. याचा फायदा भारतीय संघाला झाला, पूर्वी पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ आता 51.52 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
दुसरीकडे, वेस्ट इंडिज 26.93 टक्के गुणांसह आठव्या स्थानावर कायम आहे. तथापि, या विजयामुळे त्यांच्या गुण टक्केवारीत सुधारणा झाली आहे. जागतिक विश्वचषक 2025-27 च्या गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या स्थानावर पोहोचला असला तरी, अंतिम फेरीपर्यंतचा त्याचा मार्ग अजूनही सोपा नाही. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका संघासाठी निर्णायक ठरेल.