SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

IND VS NZ Test Cricket : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने जबरदस्त फलंदाजी करून 85 धावा केल्या. यावेळी त्याने गौतम गंभीरचा रेकॉर्ड मोडला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 20, 2026, 14:46 IST | Updated: Nov 20, 2026, 15:10 IST
Image Credit: यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा
Join

IND VS NZ Test Cricket : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. यातील पहिल्या सामन्याला गुरुवार पासून सुरुवात झाली असून यातील दुसरा दिवस आज पार पडला. वेलिंगटनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये  न्यूझीलंडने 368 धावांची कामगिरी केली. याच्या उत्तरात स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने 100 हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. यावेळी यशस्वी जयस्वालने भारताला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करताना, जयस्वालने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या 66 बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले.

न्यूझीलंडमधील चॅलेंजिंग परिस्थितीला बाजूला सारून यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करून दमदार सुरुवात करून दिली. हे यशस्वी जयस्वालचं टेस्ट क्रिकेटमधील 14 वं शतक होतं. अर्धशतक पर्यंत पोहोचेपर्यंत यशस्वीने 36 धावा या फक्त बाउंड्री मारून केल्या. या अर्धशतकासह यशस्वी जयस्वालने SENA देशांमध्ये भारतीय ओपनर्समध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्याने माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर ला मागे टाकत, SENA देशांमध्ये ओपनर म्हणून 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची आपली 8 वी वेळ नोंदवली आहे.

SENA  देशांमध्ये भारतीय ओपनर म्हणून तो सर्वात जास्त 50 हून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 19 वेळा अशी कामगिरी केली असून केएल राहुलने 12 वेळा 50 हून अधिकचा स्कोअर केला आहे. तर वीरेंद्र सेहवागने 10 वेळा आणि मुरली विजयने 9 व्यांदा अशी कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने या दौऱ्यावर इंडिया ए साठी खेळताना कमालीचं प्रदर्शन केलं होतं. त्याने लागोपाठ 2 सामन्यात शतक ठोकलं होतं.

भारतीय संघाची प्लेईंग 11 : 

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी


न्यूझीलंड संघाची प्लेईंग 11 :

 केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES