'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला
Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहने आपला शिष्य अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांना लवकरात लवकर वनडे संघात खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युवराजचं म्हणणं आहे की या प्रतिभावान खेळाडूंना योग्य संधी मिळायला हव्यात.
Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने एक महत्वाचं विधान करून बीसीसीआय सिलेक्टरचं लक्ष वेधून घेतलं आहे. युवराज सिंहच्याच्या मते, जर भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथला आणि तरुण प्रतिभेला योग्य न्याय द्यायचा असेल, तर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीसारख्या प्रतिभावान खेळाडूंना लवकरात लवकर वनडे संघात समाविष्ट केले पाहिजे. या चर्चेदरम्यान त्याने विकेटकिपर ईशान किशनचाही उल्लेख केला.
काय म्हणाला युवराज सिंग?
पीटीआयशी बोलताना युवराज सिंगने अभिषेक शर्माला वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी युवराज म्हणाला की त्याने ठामपणे सांगितले की, जर अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंची 50 ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी निवड होत नसेल, तर एका अर्थाने आपण देशातील प्रतिभेला न्याय देण्यात अपयशी ठरत आहोत. याच सोबत युवराज सिंहने असं देखील सांगितलं की, संघात आधीच अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत, ज्यामुळे कोणालाही अंतिम अकरा जणांच्या संघात किंवा 15 सदस्यांच्या संघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. तरीही त्यांच्या अलीकडील कामगिरीचा विचार करता, या तरुण खेळाडूंना लवकरात लवकर संघात समावेश करून घेणे आवश्यक आहे.
अभिषेक शर्मा हा टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला आयसीसी नंबर 1 स्थानावर आहे. तो गेल्या काही वर्षांपासून या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. असे असूनही तो केवळ एकाच फॉरमॅटपुरता मर्यादित राहिल्याचे दिसते आणि वनडे किंवा टेस्ट संघात स्थान मिळवण्यापासून तो अजूनही बराच दूर आहे. दुसरीकडे वैभव सूर्यवंशी ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अगदी लहान वयातच खळबळ उडवून दिली होती. त्याच्यासाठीही T20 संघात स्थान मिळवणे सोपे राहिलेले नाही. इंग्लंड विरुद्ध त्याचं भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज वेळापत्रक :
पहिला सामना : 4 नोव्हेंबर
दुसरा सामना : 7 नोव्हेंबर
तिसरा सामना : 10 नोव्हेंबर
चौथा सामना : 13 नोव्हेंबर
पाचवा सामना : 15 नोव्हेंबर