• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मोठी बातमी! युझवेंद्र चहल याचा भाजपमध्ये प्रवेश; मैदानानंतर राजकारणाच्या मैदानात

मोठी बातमी! युझवेंद्र चहल याचा भाजपमध्ये प्रवेश; मैदानानंतर राजकारणाच्या मैदानात

युझवेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहलने आपल्या राजकीय कारकिर्दीची घोषणा केली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 21, 2026, 22:20 IST|Updated: Nov 21, 2026, 22:52 IST
joinshare
मोठी बातमी! युझवेंद्र चहल याचा भाजपमध्ये प्रवेश; मैदानानंतर राजकारणाच्या मैदानात

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने चहलला भारतीय संघामध्ये स्थान मिळत नव्हते त्यामुळे मग अनेक सामन्यांमध्ये कॅामेंट्री करताना देखील दिसला. युझवेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहलने आपल्या राजकीय कारकिर्दीची घोषणा केली आहे. तो शनिवारी भारतीय जनता पक्षात सामील झाला. पक्षाने त्याला विशेष निमंत्रित म्हणून राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारी समितीवर नियुक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मोर्चामध्ये केलेल्या अनेक नवीन नियुक्त्यांचा हा एक भाग आहे. यापूर्वी, युझवेंद्र चहलने ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अमरपाल मौर्य यांची भेट घेतली.

मौर्य यांनी सोशल मिडियावर एक यादी शेअर केली आहे यामध्ये सर्वांच्या स्वाक्षरी आहेत. स्वाक्षरी केलेल्या या यादीत राष्ट्रीय कार्यकारिणीतील इतर दोन विशेष निमंत्रितांच्या नावांचाही समावेश आहे, त्याचबरोबर ओडिशाचे प्राध्यापक अद्वैत चरण गडनायक आणि उत्तर प्रदेशच्या वकील सीमा समृद्धी कुशवाहा ही देखील नावे त्या यादीमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाने आपली संघटना मजबूत आणि संघटित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर मोठ्या संख्येने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 

Cricketer Yuzvendra Chahal has joined the BJP. He has been appointed as a ‘Special Invitee’ to the BJP’s newly constituted National OBC Morcha executive committee. https://t.co/EvjkcBoADt

— IANS (@ians_india) November 21, 2026

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. या मालिकेत, भाजपने 37 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची नावे, तसेच सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय महासचिव आणि सात राष्ट्रीय मंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या संघटनात्मक विस्तार प्रक्रियेत देशातील विविध राज्ये आणि प्रदेशांतील अनुभवी व सक्रिय नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून तळागाळात पक्षाची पकड आणखी मजबूत होईल आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी संघ पूर्णपणे तयार राहील.

हे ही वाचा

बीसीसीआयने केली इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!

भाजपने ओबीसी मोर्चासाठी सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय सरचिटणीस आणि सात राष्ट्रीय सचिवांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये आसामचे जोगेन मोहन, ओडिशातील ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता, महाराष्ट्राचे बबनराव रावजी चौधरी, दिल्लीचे सतप्रकाश राणा, बिहारचे अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशातील संगीता बलवंत बिंद यांचा समावेश आहे. दिल्लीचे गजेंद्र यादव, कर्नाटकचे प्रमोद माधवराज आणि छत्तीसगडचे ललित चंद्राकर यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिवांमध्ये गुजरातचे दशरथजी ठाकोर, तामिळनाडूचे टी. वरथाराजन, झारखंडचे संजीव कुमार उर्फ ​​बबलू भगत, हरियाणातील सरिता जांगीड, तेलंगणाचे कडगंची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पनवार आणि बिहारचे भीमकुमार साहू यांचा समावेश आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Sports News