SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Aadhaar Update: मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट फ्री; जाणून घ्या अंतिम तारीख

बालदिननिमित्त UIDAI ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करून लोकांना त्यांच्या मुलांचे आधार तात्काळ अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 14, 2026, 05:46 PM IST | Updated: Nov 14, 2026, 05:56 PM IST
Join

भारतीयांसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. शाळेमध्ये मुलाला अॅडमिशन मिळवण्यासाठी असो किंवा कोणत्याही सरकारी कागदपत्र किंवा कामासाठी असो आधारकार्ड म्हणजेच ओळखपत्र फार महत्त्वाचे आहे. लहान मुलांसाठी निळ्या रंगणाच कार्ड बनवले जाते त्याला बाल आधारकार्ड असेही म्हंटले जाते. जेव्हा मुलाचा जन्म होतो किंवा ते 5 वर्षांपेक्षा लहान असतात, तेव्हा हे कार्ड त्यांची पहिली सरकारी ओळख बनते. बाल आधार कार्डवर आधार क्रमांकासोबत फक्त फोटो असतो, त्यावर बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन नसते. जसजसे मूल मोठे होते, चेहरा बदलतो, बोटे मोठी होतात, तेव्हा तेच जुने कार्ड अपूर्ण होते. तेव्हाच अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाची (MBU) वेळ येते.

आज बालदिन आहे यानिमित्त UIDAI ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करून लोकांना त्यांच्या मुलांचे आधार तात्काळ अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. UIDAI ने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, "या बालदिनानिमित्त, आपल्या मुलाच्या डिजिटल ओळखीची तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घ्या! आपल्या मुलासाठी बाल आधार काढा आणि ते 5 आणि 15 वर्षांचे झाल्यावर अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) पूर्ण करतील याची खात्री करा. लक्षात ठेवा! MBU सुविधा 5 ते 17 वयोगटातील मुलांसाठी 30 सप्टेंबर 2027 पर्यंत विनामूल्य उपलब्ध आहे. या बालदिनानिमित्त, आपल्या मुलाचे आधार वेळेवर अद्ययावत करण्याची प्रतिज्ञा घ्या!"

हे ही वाचा

आता घरबसल्या बदला आधारशी लिंक मोबाईल नंबर; OTP आणि फेस व्हेरिफिकेशनने होईल काम

बाल आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया

तुम्ही थेट आधार केंद्राला भेट देऊ शकता किंवा वेळ वाचवण्यासाठी आगाऊ अपॉइंटमेंट बुक करू शकता.
भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी, UIDAI च्या वेबसाइटला किंवा bookappointment.uidai.gov.in या वेबसाइटला भेट देऊन सर्वात जवळचे केंद्र शोधा आणि वेळ आरक्षित करा.

सोबत काय घेऊन जावे

मुलाचे/मुलीचे आधार कार्ड.
मुलाला सोबत घेऊन जा.
सहसा, अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते, परंतु तरीही, मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकांनी त्यांचे आधार कार्ड सोबत बाळगावे.
ऑपरेटरला कळवा की मुलाची बायोमेट्रिक्स अद्ययावत करणे आवश्यक आहे.
आता मुलाचा नवीन फोटो काढला जाईल, सर्व 10 बोटांचे ठसे आणि दोन्ही डोळ्यांचे आयरीस स्कॅन घेतले जाईल.
स्लिप्स घ्या आणि त्यांचा मागोवा ठेवा.
अपडेट स्लिप/यूआरएन क्रमांक जपून ठेवा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES