अमूलचा सर्वसामान्यांना मोठा झटका! दुधाच्या दरात वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीपाठोपाठ अमूल डेअरीने मोठा निर्णय घेतला आहे. अमूलनेही दुधाचे दर वाढवून सर्वसामान्यांना झटका दिला आहे.
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मदर डेअरीपाठोपाठ अमूल डेअरीने सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्वसामान्यांना अमूल गोल्डच्या दरात प्रति लिटरमागे ₹4 रुपये अधिक द्यायचे आहेत. तर अमूल ताझाच्या दरात प्रति लिटर ₹2 रुपये जास्त द्यायचे आहे. याचा अर्थ तुम्ही अमूल गोल्ड दुधासाठी प्रति लिटर ₹70 देत होते. तर आता तुम्हाला ₹74 द्यावे लागणार आहे.
अमूल गोल्डच्या दरात प्रति लिटर 5.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल ताझा दुधाच्या दरात 3.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर उद्या सकाळच्या (12 नोव्हेंबर 2026) गुरूवारी होणाऱ्या पुरवठ्यापासून लागू करण्यात येणार आहे. तर डेअरीने यापूर्वी 14 मे 2026 रोजी दरवाढ केली होती .
कंपनीने ही दर वाढ का केली आहे, याबद्दलही स्पष्ट केलं आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य आणि पॅकेजिंगच्या वाढलेल्या खर्चामुळे हे दर वाढवण्यात करण्यात आली आहे. पण याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट गडबडणार आहे.