ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची चर्चा मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत पाहायला मिळाली आहे. फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमतीला महागडा आहे पण भारतामध्ये त्याची मागणी असूनही त्याचा तुटवडा जाणवत आहे. ॲपलने आयफोन 18 सिरीज लॅान्च केली आहे आणि त्यानंतर जगभरामध्ये त्यांची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. ॲपलने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही, फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत 3 लाखापासून सुरुवात होते, पण या मोबाईलच्या सुरुवातीच्या स्टॅाकच्या कमतरतेमुळे खरेदी करणे कठीण जात असल्याची माहिती समोर आली आहे.
लाइव्हमिंट दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादसह काही भागांतील विक्रेते अधिकृत किमतीपेक्षा 70,000 ते 1 लाख रुपये जास्त आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ॲपलने आज, 23 ऑक्टोबर 2026 रोजी भारतात आयफोन ड्युओची विक्री सुरू केली. मर्यादित पुरवठ्यामुळे अनेक ग्राहकांना फोनसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. अहवालात म्हटले आहे की, काही विक्रेत्यांना त्यांच्या मागणीपेक्षा खूपच कमी युनिट्स मिळाले आहेत. दरम्यान, काही विक्रेते अजूनही अधिकृत किमतीत फोन विकत आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा
दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील विक्रेत्यांचा हवाला देणाऱ्या लाइव्हमिंटच्या एका अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे की, काही दुकानदारांना फोनचे खूपच कमी युनिट्स मिळाले आहेत, मोजकेच युनिट्स दुकानदारांना मिळाल्यामुळे स्मार्टफोनचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे की, अनेक दुकानांना फक्त सुमारे 10 युनिट्स मिळाले, तर काही मोठ्या विक्रेत्यांना, विविध व्हेरिएंट्ससह सुमारे 100 युनिट्सची अपेक्षा असताना, फक्त 5 ते 7 फोन मिळाले.
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या (AIMRA) मते, काही ग्राहक फोन लवकर मिळवण्यासाठी अधिकृत किमतीपेक्षा 25000 ते 1 लाख रुपये अधिक देण्यास तयार आहेत. त्यामुळे, फोन खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या अधिकृत विक्रेत्यांकडे किंमत आणि स्टॉकची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. फोनच्या मर्यादित उपलब्धतेमुळे, ग्रे मार्केटमध्ये मागणी वाढल्याचे वृत्त आहे. ग्रे मार्केट म्हणजे असे सेल्युलर नेटवर्क जे कंपनीच्या अधिकृत रिटेल चॅनलचा भाग नसतात. असे विक्रेते इतर देशांमधून फोन आयात करून भारतात विकू शकतात.