तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळं व त्यामुळं होणाऱ्या गंभीर परिणामामुळं अनेकजण आता धातुची भांडी पुन्हा वापरात आणत आहेत. तांबा-पितळेच्या भांड्यांत पाणी पितात. काही जण रात्रभर भांड्यात पाणी ठेवतात मग सकाळी पितात. पण याने खरंच आरोग्याला फायदा होतो का? जाणून घ्या.
तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. पचनक्रीय सुधारते असा दावा केला जातो. हे पाणी पिण्याचे योग्य नियम पाळल्यास नक्कीच फायदे होतात. पण याचे नियम कोणते जाणून घेऊयात. धातूची भांडी वापरताना काय काळजी घ्यावी? जाणून घेऊयात.
प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा भांड्यांमध्ये पाणी साठवल्याने त्यातील सूक्ष्म प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा भांड्यांमध्ये पाणी साठवल्याने त्यातील सूक्ष्म प्लास्टिकचे कण आणि घातक रसायने पाण्यात मिसळतात. यामुळं हार्मोनल असंतुलन, पचनाचे विकार, वजन वाढणे आणि दीर्घकाळात कर्करोगासारख्या आजाराचा धोका वाढतो. याचा भीतीपोटी लोक प्लास्टिक टाळत आहेत.
सकाळी उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील 1 ते 2 ग्लास पाणी पिणे सर्वात जास्त लाभदायक ठरते. पण तांब्यातील पाणी दिवसभर पिऊ नये. शरीरात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास उलट्या, जुलाब किंवा यकृतावर ताण येऊ शकतो.
तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 साठवलेले पाणी पिण्याने शरीरातील त्रिदोष वात संतुलित राहतात. हे पाणी यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करते. ज्यामुळं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
तांब्यामध्ये नैसर्गिकरित्या सूक्ष्मजीवनाशक गुणधर्म असतात. जे पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात.
पचनसंस्था मजबूत करते. गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. शरीरातील लाल रक्तपेशींच्या निमित्ताने गती मिळते आणि सांधेदुखी कमी होते.