मोठी बातमी! SBI च्या 3.75 लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर्सचा दावा, KYC डॉक्यूमेंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात
तुमचं एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. बँकेच्या लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचे दावे समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बँक एसबीआयसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमचं देखील एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर चिंतेची बातमी आहे. 'सिरियससिम' नावाच्या एका हॅकर ग्रुपने मोठा दावा केला आहे. 'सिरियससिम' ने असा दावा केला आहे की, एसबीआयच्या 3,75,000 ग्राहकांचा डेटा लीक करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर त्यांच्याकडे 2,722 पीडीएफ फाइल्सदेखील आहेत. याबद्दल सायबरपल्स56 नावाच्या सायबर सुरक्षा खात्याने सोशल मीडिया प्लॅटफॉम एक्स (X) वर माहिती दिली आहे. या दाव्यानंतर बँकिंग क्षेत्रासह देशात खळबळ माजली आहे. तरदुसरीकडे ज्याचे खाते एसबीआयमध्ये आहेत, अशा ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या दाव्यानुसार लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, कर्ज अर्ज, खाते खाते उघडण्याचे अर्ज, पत्ते आणि कागदपत्र आहेत. महत्त्वाचे म्हणजे या डेटा लीकबद्दल एसबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. जर हा दावा खरा असेल तर देशभरात मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बँकेमधील ग्राहकांची ही माहिती लीक केल्याचा दावा!
- ग्राहकांची वैयक्तिक माहिती
- बँक खाते उघडण्याशी संबंधित कागदपत्रे
- कर्जाचे अर्जही आहेत.
- ग्राहकांच्या पत्त्यांशी संबंधित माहिती
ग्राहकांनी ही सावधगिरी बाळगावी अन्यथा
जर हा दावा खरा असेल तर सीबीआयमध्ये अकाऊंट असलेल्या ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचं मोठं आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
- कोणत्याही अनोळखी कॉल, लिंक किंवा मेसेजबाबत सावधगिरी ठेवा
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका
- अनोळखी व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.
- तुमचा एटीएम पिन कोणासोबतही शेअर करू नका.
- तुमच्या बँक खात्यामध्ये असा कोणताही व्यवहार झाला असेल ज्याची तुम्हाला माहिती नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- याबद्दल तुमच्या बँकेला तात्काळ कळवा.