• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /महिला शेतकरी प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार? ऑनलाइन अर्ज कसा करावा, काय आहे निकष?

महिला शेतकरी प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार? ऑनलाइन अर्ज कसा करावा, काय आहे निकष?

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने कृषी विभाग पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 02:16 PM IST|Updated: Sep 30, 2026, 02:20 PM IST
joinshare
महिला शेतकरी प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार? ऑनलाइन अर्ज कसा करावा, काय आहे निकष?
Image Credit: apply for the Maharashtra Woman Farmer Certificate online

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम-2006 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महिला शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. या प्रमाणपत्राच्या सहाय्याने महिलांना शासकीय योजनांसह कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच विस्तार सेवांचा लाभ मिळणार आहे. पण हे प्रमाणपत्र कसं काढायच? जाणून घ्या.

महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देण्यासाठी व प्रमाणपत्र मिळवण्यात सोप्पे जावे यासाठी ऑनलाइन पोर्टल लाँच करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर फक्त 15 दिवसांत हे प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पात्र महिला शेतकरी राज्य शासनाच्या अधिकृत कृषी पोर्टलवर जाऊन स्वतःच्या मोबाइलवरुन किंवा जवळच्या आपले सरकार केंद्रात जाऊन अर्ज करु शकतात.

कसा कराल अर्ज?

अधिकृत पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर व आधार कार्डद्वारे नोंदणी करा. त्यानंतर तुमची वैयक्तीक माहिती, बँक खाते आणि शेतीशी संबंधित सर्व तपशील ऑनलाइन फॉर्ममध्ये भरा. आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे. तलाठी, कृषी सहाय्यकाद्वारे डिजीटल पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांत ई प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे.

शेतकरी प्रमाणपत्रासाठीचे निकष काय?

अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी हवी. तसंच, तिचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. महिलेच्या नावावर 7/12 उतारा असावा. किंवा पती वा कुटुंबातील सदस्याच्या 7/12 वर नाव असलेली आणि प्रत्यक्ष शेतीकाम करणारी महिला. सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरीही कुटुंबातील शेतीत सक्रीय सहभाग असल्याचे स्थानिक ग्रामपंचायती अधिकारी किंवा तलाठ्याचे प्रमाणपत्र जोडल्यास अर्ज सादर करता येणार आहे.

नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे

आधार कार्ड, मतदान कार्ड, अद्यावर 7/12, 8-अ उतारा, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Government Schemes