• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /महाराष्ट्रात लिफ्टसाठी नवी नियमावली लागू! 'या' व्यक्तींना एकट्याने लिफ्ट वापरण्यास मनाई

महाराष्ट्रात लिफ्टसाठी नवी नियमावली लागू! 'या' व्यक्तींना एकट्याने लिफ्ट वापरण्यास मनाई

New Elevator Rules In Maharashtra: लिफ्टसाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून मुंबईसह राज्यभरात ही नियमावली लागू होणार आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 08:06 IST|Updated: Nov 18, 2026, 08:08 IST
joinshare
महाराष्ट्रात लिफ्टसाठी नवी नियमावली लागू! 'या' व्यक्तींना एकट्याने लिफ्ट वापरण्यास मनाई
Image Credit: New elevator rules in Maharashtra

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लिफ्टमुळं होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 12 वर्षाखालील मुलांना पालकांशिवाय एकट्याने लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2026 पासून  मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू झाली आहे.

मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमधील लिफ्ट दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2026 पासून महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक, 2026 या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  राज्य ऊर्जा विभागाने अलीकडेच याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून,  त्यात गृहनिर्माण संस्था (सोसायट्या) आणि व्यावसायिक संकुलांमधील लिफ्टच्या देखभालीची जबाबदारी अधिक कठोर करण्यात आली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांत गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. परिणाम एका इमारतीत दोन-दोन लिफ्ट असतात. मात्र सुरक्षेची काळजी न घेतल्याने लिफ्ट कोसळून मोठे अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळं काही लोकांनी जीव गमावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, लिफ्ट किंवा सरकत्या जिन्याशी संबंधित कोणताही अपघात घडल्यास 24 तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. लिफ्टना सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित बचाव उपकरणे आदी सुविधा देण्यासाठी 28 ऑक्टोबर 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

संबंधित भागात अतिरिक्त सेवा केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे लिफ्टसंबंधित तक्रारी, बिघाड किंवा अडचणी निर्माण झाल्यास दुरुस्तीसाठी तातडीने मदत मिळेल, अशा सूचना कंत्राटदारांसाठीही बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

नियमावली काय?

-प्रत्येक सोसायटी आणि व्यावसायिक इमारतीतील लिफ्टची नोंदणीकृत

- कंत्राटदाराकडून दरमहा नियमित तपासणी व सव्र्व्हिसिंग करणे बंधनकारक.

-या तपासणीचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवणे व्यवस्थापनाला अनिवार्य

-लिफ्टचे दरवर्षी 'सुरक्षा ऑडिट' करून अहवाल विद्युत निरीक्षकांकडे सादर करावा लागणार.

-आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक लिफ्टसाठी 'थर्ड-पार्टी इन्शुरन्स' काढणे अनिवार्य.

दुर्घटना घडल्यास त्यातून पीडितांना तातडीने नुकसानभरपाई मिळणार.

-सीसीटिव्हीसह अन्य सुविधांसाठी 28 ऑक्टोबर 2027 पर्यंत मुदत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Mumbai News
Marathi Batmya