आता घरबसल्या बदला आधारशी लिंक मोबाईल नंबर; OTP आणि फेस व्हेरिफिकेशनने होईल काम
आता तुम्हाला जर आधारकार्डचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही तो घरच्या घरी तुमच्या मोबाईलमध्ये बदलू शकता. जर तुमचा जुना मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत असेल आणि तुम्ही तो आता वापरत नसाल, तर तुमच्यासाठी ही एक उपयुक्त बातमी आहे.
बऱ्याचदा आपणला आधार कार्डला जोडलेला जो नंबर असतो तो नंबर कधी बंद होतो त्यामुळे तो नंबर बदलण्यासाठी आपल्याला आधार कार्ड सेंटरमध्ये जावे लागते. आता जर तुम्हाला आधार कार्डला जोडलेला नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला आधारकार्ड सेंटरला जाण्याची गरज भासणार नाही. आता तुम्हाला जर आधारकार्डचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही तो घरच्या घरी तुमच्या मोबाईलमध्ये बदलू शकता. जर तुमचा जुना मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत असेल आणि तुम्ही तो आता वापरत नसाल, तर तुमच्यासाठी ही एक उपयुक्त बातमी आहे.
अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी ओटीपी आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर पाठवले जातात. त्यामुळे, जर तो नंबर निष्क्रिय (disabled) असेल, तर बँकिंग सेवा, सरकारी योजना आणि इतर ऑनलाइन सेवा मिळवणे कठीण होऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, UIDAI ने आता नवीन आधार ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा समाविष्ट केली आहे.
कसा करायचा आधार ॲप वापरून मोबाईल नंबर अपडेट?
- सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये अधिकृत आधार ॲप डाउनलोड करा.
- ॲप उघडा, तुमचा 6-अंकी पिन टाका आणि लॉग इन करा.
- आता ॲपच्या सर्व्हिसेस विभागात जा.
- येथे मोबाईल नंबर अपडेट पर्याय निवडा.
- आता तुम्हाला आधारशी जोडायचा असलेला नवीन मोबाईल नंबर टाका.
- नवीन मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करा.
- त्यानंतर, ॲपमधील चेहरा प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा.
- शेवटी, आवश्यक शुल्क भरा आणि अर्ज सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला विनंतीशी संबंधित माहिती मिळेल.
हे ही वाचा
iPhone 18 सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन होतोय लाँच; iPhone 17 पेक्षा असणार पूर्ण वेगळा, देणार दोन मोठे अपग्रेड्स
तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी या प्रक्रियेत कोणतेही वेगळे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी ओटीपी पडताळणी, चेहरा प्रमाणीकरण आणि विहित शुल्काचे पेमेंट करणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधारमध्ये आधीपासून मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल, तर तो पहिल्यांदा जोडण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. ॲपद्वारे अर्ज सादर केल्यानंतर नवीन मोबाईल नंबर आधारमध्ये लगेच अपडेट होत नाही. UIDAI नुसार, मोबाईल नंबर किंवा पत्ता अपडेट करण्याच्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी ३० दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे, अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल. तुम्ही ॲपमधील 'ट्रॅक माय रिक्वेस्ट' (Track My Request) या पर्यायावर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.