• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /बिझनेस
  • /बँक तुम्हाला देईल 100 ते 5000 रुपयांपर्यंत दंड, 'या' 5 गोष्टींवर ठेवा बारीक नजर!

बँक तुम्हाला देईल 100 ते 5000 रुपयांपर्यंत दंड, 'या' 5 गोष्टींवर ठेवा बारीक नजर!

बँकेनेच एखादी सेवा देण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त विलंब केला, तर काही परिस्थितींमध्ये ग्राहकांना नुकसानभरपाई मिळू शकते.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 10, 2026, 10:10 PM IST|Updated: Oct 10, 2026, 10:27 PM IST
joinshare
बँक तुम्हाला देईल 100 ते 5000 रुपयांपर्यंत दंड, 'या' 5 गोष्टींवर ठेवा बारीक नजर!
Image Credit: बँक ग्राहकांकडून एटीएम, चेक, संदेश आणि इतर सेवांसाठी विविध शुल्क आकारले जाते. पण बँकेनेच एखादी सेवा देण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त विलंब केला, तर काही परिस्थितींमध्ये ग्राहकांना नुकसानभरपाई मिळू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, व्यवहार अयशस्वी होणे, क्रेडिट कार्ड बंद करण्यास विलंब किंवा कर्जाची कागदपत्रे परत न मिळणे अशा प्रकरणांमध्ये दररोज 100 ते 5000 रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बँक ग्राहकांकडून एटीएम, चेक, संदेश आणि इतर सेवांसाठी विविध शुल्क आकारले जाते. पण बँकेनेच एखादी सेवा देण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त विलंब केला, तर काही परिस्थितींमध्ये ग्राहकांना नुकसानभरपाई मिळू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, व्यवहार अयशस्वी होणे, क्रेडिट कार्ड बंद करण्यास विलंब किंवा कर्जाची कागदपत्रे परत न मिळणे अशा प्रकरणांमध्ये दररोज 100 ते 5000 रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

यूपीआय किंवा एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास 

यूपीआयद्वारे पैसे पाठवताना किंवा एटीएममधून पैसे काढताना व्यवहार अयशस्वी झाला, पण खात्यातून पैसे वजा झाले, तर बँकेने संबंधित नियमांनुसार ठरलेल्या मुदतीत रक्कम परत करणे आवश्यक आहे. ही मुदत संपल्यानंतरही पैसे परत न मिळाल्यास पात्र प्रकरणांत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 100 रुपये नुकसानभरपाई मिळू शकते.उदाहरणार्थ, यूपीआय व्यवहारात पैसे वजा झाले; मात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाले नाहीत, तर अशा व्यवहारासाठी लागू असलेली कालमर्यादा तपासणे महत्त्वाचे आहे. व्यवहाराचा क्रमांक, संदेश आणि खात्याचे विवरण तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा.

क्रेडिट कार्ड बंद करण्यास उशीर झाल्यास

ग्राहकाने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केल्यानंतर बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने साधारणपणे सात कामकाजाच्या दिवसांत विनंती पूर्ण करणे आवश्यक आहे. ग्राहकाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही कार्ड बंद करण्यास विलंब झाल्यास, नियमांनुसार विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी 500 रुपये नुकसानभरपाई द्यावी लागू शकते.त्यामुळे कार्ड बंद करण्यासाठी दिलेल्या अर्जाची तारीख, पोचपावती आणि बँकेशी झालेला पत्रव्यवहार जतन करा.

कर्ज फेडल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे न मिळाल्यास 

घर किंवा अन्य मालमत्तेवरील कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर बँकेने मूळ मालमत्ता कागदपत्रे परत करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कर्जाची पूर्ण परतफेड किंवा तडजोड झाल्यानंतर कर्जदात्याला कागदपत्रे परत करण्यासाठी 30 दिवसांची मुदत असते. बँकेमुळे कागदपत्रे परत करण्यास विलंब झाल्यास, नियमानुसार प्रत्येक दिवसासाठी 5000 रुपये नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. कागदपत्रे हरवली किंवा खराब झाली असल्यास, ती मिळवण्यासाठी आवश्यक मदत आणि खर्चाची जबाबदारीही संबंधित नियमांनुसार कर्जदात्यावर येऊ शकते.

पत अहवालातील चुकीची माहिती दुरुस्त न केल्यास 

तुमच्या पत अहवालात चुकीची थकबाकी, बंद केलेल्या कर्जाची नोंद किंवा अन्य त्रुटी असल्यास संबंधित बँक अथवा पतमाहिती संस्थेकडे तक्रार करता येते. अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लागू नियमांनुसार ३० दिवसांची कालमर्यादा आहे.निश्चित मुदतीत तक्रारीचे निराकरण न झाल्यास, पात्र प्रकरणांमध्ये प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 100 रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. चुकीच्या नोंदीमुळे कर्ज मिळण्यात अडचण येत असल्यास तक्रारीची नोंद आणि संबंधित पुरावे जतन करणे महत्त्वाचे आहे.

बँकेच्या लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास भरपाई

बँकेच्या निष्काळजीपणामुळे, चोरी, आग किंवा फसवणुकीमुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास बँकेची जबाबदारी लागू होऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, अशा विशिष्ट प्रकरणांमध्ये भरपाईची कमाल मर्यादा लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट आहे.उदाहरणार्थ, लॉकरचे वार्षिक भाडे 3000 रुपये असल्यास, नियमानुसार कमाल भरपाई तीन लाख रुपये होऊ शकते. मात्र, प्रत्येक प्रकरणात ही रक्कम मिळेलच असे नाही. नुकसानाचे कारण, बँकेची जबाबदारी आणि लागू नियम यांचा विचार केला जातो.

ग्राहकांनी काय करावे? 

बँकेने ठरलेल्या मुदतीत सेवा दिली नाही, तर प्रथम संबंधित बँकेकडे लेखी तक्रार करा. तक्रारीचे निराकरण न झाल्यास, लागू अटींनुसार रिझर्व्ह बँकेच्या तक्रार निवारण व्यवस्थेकडे दाद मागता येते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Banking News
Personal Finance