दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, चांदी 10 हजारांनी तर सोनं 3 हजार 500 रुपयांनी वाढलं, पाहा सोनं चांदीचे ताजे रेट्स
Gold And Silver Rates : दिवाळीच्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 10 हजारांनी तर सोन्याच्या दरात 3 हजार 500 रुपयांनी वाढ झालेली आहे.
Gold And Silver Rates : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर जागतिक बाजारपेठेत मोठे आर्थिक बदल पाहायला मिळत असून त्याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे. अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात 3 हजार 500 रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर 1 लाख 38 हजार रुपयांवरून 1 लाख 41 हजार 500 रुपयांवर, तर चांदीचे दर 1 लाख 80 हजारांवरून 1 लाख 90 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिकन बॉण्ड बाजारावर निवडणूक निकालांचा परिणाम झाल्याने जगभरातील गुंतवणूकदार सोन्या-चांदीतील गुंतवणुकीकड वळल्याने मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. आज सोन्याचा भाव जीएसटी सहित 145700 रुपये तर चांदीचा दर जीएसटी सहित 195700 रुपये आहे.
4 नोव्हेंबर रोजी भारतातील प्रमुख शहरात सोनं चांदीचा भाव :
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत बुधवारी 4 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,050 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,250 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत बुधवारी 4 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,100 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात बुधवारी 4 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,100 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
हेही वाचा : निवडणूक लढवताना अपत्यांच्या नियमाची गरज संपली? सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये बुधवारी 4 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर :24 कॅरेट सोने: ₹142,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,100 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये बुधवारी 4 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,910 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,000 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,350 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)