SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Stock Market मधून Passive Income मिळवण्यासाठी AI करेल मदत! कसं ते जाणून घ्या; शेअर्स खरेदी करताना ही चूक टाळा

शेअर मार्केटमधून पैसे कमवणे तेवढं सोपं नाही. पण तुम्हालाही नोकरी किंवा व्यवसायासोबत शेअर मार्केटमधून ठराविक रक्कम कमवायची असेल तर AI तुम्हाला मदत करु शकतं, पण ते कसं ते जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 16, 2026, 08:42 PM IST | Updated: Oct 16, 2026, 09:17 PM IST
Image Credit: Passive Income
Join

नोकरी किंवा व्यवसाय करत असताना प्रत्येकाला इतर मार्गातून कसा पैसा कमावता येईल याचा विचार असतात. अशावेळी अनेक जण शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना शेअर मार्केटमधील गणित समजल्यास ते पैसे मिळवणे सोपं होतं. पण दुसरीकडे नवीन लोक शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना सोशल मीडियावरील बनावट ग्रुप्स, यूट्यूब व्हिडीओ किंवा केवळ मागील एका वर्षातील भरघोस परतावा पाहून कोणत्याही शेअरमध्ये पैस गुंतवतात. अशावेळी अनेक वेळी ते मोठ्या आर्थिक संकटात सापडतात. 

आता तुमची हीच समस्या दूर करण्यासाठी आणि शेअर मार्केटमधून ठराविक रक्कम मिळवण्यासाठी  AI तुमच्या मदतीसाठी सज्ज झालं आहे.  AI ने आधारित मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म kwalaintel.com आपल्या मदतीसाठी आणलं आहे.  आता या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्हीही एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकतात आणि तेही कुठल्याही रिक्सशिवाय.


अमेरिकेतील NYSE आणि Nasdaq मधील गुंतवणूकदारांना मदत केल्यानंतर आता Kwala Intel भारतीयांच्या मदतीस आला आहे.  वॉल स्ट्रीटनंतर आता दलाल स्ट्रीटवरील भारतीय गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनाही स्वतःचा AI सुपरब्रेन मदतीस सज्ज आहे.

अशास्थितीत तुम्हाला कोणताही भीती किंवा अचूक निर्णयासाठी शेअर मार्केटमधून नियमित उत्पन्न मिळण्यासाठी जुनी पद्धत आता सोडा आणि नवीन पद्धत अवलंबा. तुम्हाला  एक स्मार्ट गुंतवणूकदार बनवण्यासाठी AI-आधारित मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म kwalaintel.com च्या फायदेशीर ठरणार आहे.

भारतीयांसाठी अवघ्या ₹199 प्रति महिन्यात तुम्हाला अमर्यादित AI स्टॉक रिसर्चचा ॲक्सेस मिळणार आहे. यासाठी Kwala Intel च्या अधिकृत वेबसाइट तुम्हाला मदत करणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या भाषेत म्हणजे मराठी असो किंवा तेलगू कुठल्याही भाषेत तु्म्ही लाईव्ह मार्केट रिसर्च करू शकता. 15 हून अधिक भारतीय भाषांमध्ये तुम्ही यावर माहिती मिळवू शकता. 

ही शेअर्स खरेदी करताना ही चूक करू नका!

शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्या प्रत्येक जण एक मोठी चूक कायम करतो. ही चूक म्हणजे सर्वाधिक परतावा...तुमचे पैसे डबल, टिबल करून मिळती अशी जाहिरात पाहतात आणि कष्टाने कमावलेले पैसे गुंतवतात. हे अगदी असंच बाहेरून सुंदर दिसणारी वस्तू कायम आतून न पाहता खरेदी करणे. 

शेअर मार्केटमधील गणित हे अतिशय काळजीपूर्वक आणि अभ्यास करून गुंतवणूक करावी लागते. कारण एखादी कंपनीचे शेअर भरघोस परतावा देत असेल पण भविष्यातही ती देईलच असं नाही. अशावेळी तुम्हाला Kwala Intel AI मदतगार ठरणार आहे. 

तुम्हाला या टूलचा वापर करण्यासाठी, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता की, 'या शेअरची खरी परिस्थिती काय आहे?' अशा वेळी AI टूल अवघ्या 15 सेकंदांत संपूर्ण रिसर्च करून तुम्हाला कंपनीचे फंडामेंटल्स (Fundamentals), बिझनेस मॉडेल, पीई रेशो (PE Ratio) आणि प्रमोटर होल्डिंग यांचे विश्लेषण देते. एवढंच नाहीतर त्या शेअरने दिलेल्या परताव्यामागील खरी परिस्थिती तुमच्यासमोर प्रसिद्ध करते, असा Kwala Intel AI दावा आहे. 

यामुळे तुम्ही खोट्या जाहिरात किंवा भरघोस परताव्यापासून तुमची फसवणूक होण्यापासून टाळू शकता. शिवाय शेअर खरेदी आणि विक्रीसाठी योग्य एंट्री आणि एक्झिट लेव्हल्स समजून घेण्यासही तुम्हाला Kwala Intel AI फायदेशीर ठरणार आहे. 

Kwala Intel AI हा तुमचा बिनपगारी स्टॉक रिसर्च असिस्टंट!

हो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्या पैसे घेऊन स्टॉक रिसर्च असिस्टंट म्हणून काम करतात. हे असिस्टंट एका ठराविक वेळमध्ये काम करतात. पण Kwala Intel AI हा तुमचा बिनपगारी आणि 24/7 वैयक्तिक स्टॉक रिसर्च असिस्टंट असणार आहे. 

एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या Kwala Intel हे कोणतेही स्टॉक ब्रोकर किंवा शेअर बाजारातील टिप्स देणारे प्लॅटफॉर्म नसणार आहे. तर हे एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण AI स्टॉक रिसर्च टूल असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे टूल लाईव्ह मार्केट डेटा, कॉर्पोरेट फाइल्स आणि बातम्यांचे विश्लेषण करून अवघ्या 15 सेकंदांत तुम्हाला अचूक माहिती आणि विश्लेषण देईल असा दावा यांनी केला आहे. 

Kwala Intel AI या टूलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यावर माइक किंवा टेक्स्ट या दोन्ही स्वरुपात प्रश्न विचारू शकतात. त्यासोबतच या टूलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आर्थिक क्षेत्रातील अवघड आणि क्लिष्ट संज्ञा शिकण्याची कुठलीही आवश्यकता नाही. तुम्ही थेट सर्च बारमध्ये तुमचा प्रश्न टाइप करू शकता किंवा माइकचे बटण दाबून थेट बोलूनही प्रश्न विचारून तुमच्या मनातील गोंधळ दूर करु शकता. 

उदाहरणार्थ, 'आज सुझलॉनच्या शेअरचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स किती आहे?' किंवा 'HDFC बँकेचा आर्थिक निकाल कसा लागला?'

अशा प्रश्नांची उत्तरे हे टूल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत लगेचच देईल. 

Kwala Intel Pro सबस्क्रिप्शनमध्ये काय काय सुविधा आहेत?

Kwala Intel च्या प्रो प्लॅनमध्ये सर्व सुविधा या अमर्यादित स्वरुपात असणार आहे. महत्त्वाचे यात कोणतेही छुपे शुल्क नाही, असा दावाही यांनी केला आहे. तर यात कुठल्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत, जाणून घ्या. 

डेटा फीड (Data Feed) : कंपन्या आणि विविध क्षेत्रांशी संबंधित सर्व सार्वजनिक माहिती थेट मूळ स्रोताच्या लिंकसह तुम्हाला मिळणार असून तुम्ही स्वतःही त्या माहितीची पडताळणी करू शकता. 

सेक्टर इंटेलिजन्स (Sector Intelligence) : शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांचा पैसा सध्या कोणत्या क्षेत्रात, उदाहरणार्थ ऑटोमोबाईल, आयटी किंवा बँकिंग क्षेत्रात गुंतवला जात आहे, याची रिअल-टाइम माहिती आणि ट्रॅकिंगची सुविधाही यात उपलब्ध असणार आहे. 

AI रिसर्च चॅट (AI Research Chat) : कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित हवे तितके प्रश्न यावर आणि कोणत्याही वेळी विचारू शकता. 

मार्केट टेलिमेट्री (Market Telemetry) : RSI, MACD यांसारख्या महत्त्वाच्या टेक्निकल इंडिकेटर्सचे स्वयंचलित विश्लेषण आणि रीडिंग्स कोणत्याही मर्यादेशिवाय यावर मिळणार आहे. 

Kwala Intel Pro सबस्क्रिप्शनची किंमत काय?

मासिक प्लॅन (Monthly Plan) : अवघे ₹199 प्रति महिना (GST सह)

वार्षिक प्लॅन (Yearly Plan) : अवघे ₹1,999 प्रति वर्ष (GST सह)

Kwala Intel कसं वापरायचं?

स्टेप 1: सर्वप्रथम KwalaIntel.com या अधिकृत वेबसाइट उघडा.

स्टेप 2: आता यावर तुमचे अकाउंट रजिस्टर करा. त्यानंतर ₹199 प्रति महिना असलेला अनलिमिटेड प्लॅन निवडा किंवा तुम्हाला हवा असलेला प्लॅन निवडा.

स्टेप 3: आता पुढे सर्च बारमध्ये कोणत्याही शेअरचे नाव टाका. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट किंवा माइकच्या माध्यमातून तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता. त्यानंतर AI च्या मदतीने काही वेळातच विश्लेषण तुम्हाला मिळेल. 

हे टूल कोणासाठी फायदेशीर आहे?

दीर्घकालीन गुंतवणूकदार (Long-Term Investors): एखाद्या कंपनीचे खरे मूल्यांकन (Valuation) आणि भविष्यातील वाढीची क्षमता (Growth) जाणून घेण्यासाठी फायदेशीर

इंट्राडे आणि स्विंग ट्रेडर्स (Intraday & Swing Traders): शेअर बाजारातील चार्ट्सचे विश्लेषण करून योग्य एंट्री-एक्झिट झोन आणि स्टॉप-लॉस (SL) निश्चित करून ट्रेडिंग करण्यास मदत मिळेल. 

नवशिके गुंतवणूकदार (Beginners): शेअर बाजाराची माहिती घेऊन आणि जोखीम समजून पॅसिव्ह इन्कम मिळवण्याच्या दृष्टीने गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी उपयुक्त 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES