Resume First Job : कॉलेजचा अभ्यास पूर्ण झाल्यावर जेव्हा एखादा नवोदित व्यक्ती त्याच्या पहिल्या नोकरीच्या शोधाला सुरुवात करतो, तेव्हा 'रिझ्युमे' हा अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक असतो. हा एक असा प्राथमिक दस्तऐवज आहे ज्याद्वारे कंपनी किंवा भरती करणारी व्यक्ती उमेदवाराविषयीची प्राथमिक माहिती मिळवते. अशा परिस्थितीत नवोदित उमेदवारांकडे नीटनेटका, संक्षिप्त आणि विशिष्ट नोकरीच्या स्वरूपानुसार तयार केलेला 'रिझ्युमे' असणे आवश्यक आहे. तसेच यात उमेदवाराने आपल्या रिझ्युमेमध्ये आपली कौशल्ये, प्रकल्प आणि शैक्षणिक कामगिरी प्रभावीपणे मांडली पाहिजे.
नव्या उमेदवारांनी त्यांचा रिझ्युमे हा एकाच पेजवर ठेवण्याचा प्रयत्न करा. डिझाईन हे खूप रंगीबेरंगी असण्याशिवाय सिंपल आणि प्रोफेशनल असायला हवं. याव्यतिरिक्त स्पेलिंगमधील चुका, लांबलचक परिच्छेद आणि चुकीची माहिती देणे टाळा. प्रत्येक नोकरीसाठी एकच 'रिझ्युमे' पाठवण्याऐवजी, संबंधित नोकरीच्या वर्णनानुसार आवश्यक कौशल्ये अधोरेखित करून त्यात योग्य ते बदल करा. यामुळे भरती करणाऱ्या व्यक्तीला तुमचे प्रोफाईल समजणे सोपे जाते आणि मुलाखतीसाठी तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रिझ्युमेची भाषा साधी आणि समजायला सोपी ठेवा.
एखाद्या नव्या उमेदवाराच्या नावाची सुरुवात ही मोबाईल नंबर, ईमेल आयडी, LinkedIn profile सारख्या बेसिक डिटेल्सने होते. यानंतर 2 ते 3 ओळींचा एक छोटी समरी लिहू शकता. या विभागात उमेदवार आपली करिअरविषयक उद्दिष्टे आणि नोकरीतील आपली आवड यांबद्दल माहिती देऊ शकतात. लक्षात ठेवा की, रेझ्युमेमध्ये वापरलेला ईमेल पत्ता प्रोफेशनल असावा.
उमेदवाराने आपल्या रेझ्युमेमध्ये सर्वात अलीकडील शैक्षणिक पात्रतांची माहिती लिहावी. या विभागात अभ्यासक्रम, पदवी, बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि टक्केवारी किंवा CGPA यांसारख्या तपशीलांचा समावेश असू शकतो. तसेच पूर्ण केलेली इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कार्यक्रम यांचाही यात उल्लेख केला पाहिजे. हे तपशील विशेषतः फ्रेशर्ससाठी महत्त्वाचे असतात. कारण त्यांच्याकडे सहसा पूर्ण वेळ कामाचा अनुभव नसतो.