BMC Recruitment : मुंबई महापालिकेत स्थापत्य तसेच यांत्रिकी आणि विद्युत कनिष्ठ अभियंता या पदांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून संबंधित पदांसाठी रखडलेला निकाल जाहीर करण्याचा अडथळा आता दूर झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेवरील न्यायालयीन अडथळा दूर झाला आहे. अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.
2024 या वर्षात मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरतीची जाहिरात काढली होती. त्यानंतर पदवीधर उमेदवारांच्या पात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता. या प्रकरणामुळे आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दोन वर्षांपासून राखून ठेवण्यात दोन वर्षांपासून प्रतीक्षा न्यायालयाने निकाल दिल्यामुळे आता आयबीपीएस संस्थेकडून घेण्यात आलेला निकाल जाहीर करण्याची मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
कनिष्ठ अभियंता पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा प्राप्त झालेला निकाल हा मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावा आणि मागील दोन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. या सगळ्यात न्यायालयीन प्रक्रियेमुळे परीक्षा देऊनही निकालासाठी उमेदवारांना मोठ्या कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागली. न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आता निकाल जाहीर करून पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता भरती प्रक्रियेतील न्यायालयीन अडथळा दूर झाला असल्याने कनिष्ठ अभियंता पदावरील अभियंता पदविकाधारक उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करण्यात आला आहे.